१ एप्रिलपासून २४ तास लसीकरण सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:11+5:302021-03-26T04:09:11+5:30
महापौरांचे आदेश : सफाई कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमण ...

१ एप्रिलपासून २४ तास लसीकरण सुविधा
महापौरांचे आदेश : सफाई कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमण झपाट्याने वाढत आहे. शहरात दररोज तीन हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. संक्रमणावर नियंत्रणासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. यासाठी १ एप्रिलपासून शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा लसीकरण केंद्र २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत दिले.
मनपात ७ हजार ७७७ सफाई कर्मचारी आहेत. कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कचे काम करणाऱ्यांना या सफाई कर्मचाऱ्यांपैकी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरण करणार नाही अशा सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करा, फ्रंटलाईनमधील ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नावे नोंदविलेली नाही. त्यांची नावे नोंदविण्यात यावी. शहरातील आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या दररोज २० हजारापर्यंत वाढविण्याचे निर्देश महापौरांनी मनपा प्रशासनाला दिले. नगरसेवक प्रवीण दटके यांनी २४ तास केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, आभा पांडे, कमलेश चौधरी व अन्य सदस्यांनी भाग घेतला.
मनपाच्या रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरची संख्या वाढवा, औषधांची पर्याप्त व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. आयुष रुग्णालय सदरमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करा, पाचपावलीमध्ये वॉकिंग सेंटर सुरू करण्याची सूचना केली. त्यांनी बेजबाबदारपणे फिरणाऱ्या कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी एनजीओची मदत घेण्याचेही निर्देश दिले.
...
नियंत्रण कक्षातून खाटांची माहिती द्या
महापौरांनी कोरोना नियंत्रण कक्षामधून विधानसभा क्षेत्रानुसार कोरोनाबाधित रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती देण्याचेही निर्देश दिले. कोरोना चाचणी केंद्रामध्ये एनजीओची मदत घेण्याचे आवाहन केले.