२२.९५ कोटींचा दलितवस्ती निधी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:42+5:302021-03-26T04:09:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांतील सार्वजनिक विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा ...

22.95 crore Dalitvasti fund distributed | २२.९५ कोटींचा दलितवस्ती निधी वितरित

२२.९५ कोटींचा दलितवस्ती निधी वितरित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांतील सार्वजनिक विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषदामार्फत दरवर्षी लोकसंख्येप्रमाणे निधी उपलब्ध करून दिल्या जातो. सन २०१९-२० वर्षीच्या अखर्चित राहिलेला निधी व वाढीव निधी मिळून समाज कल्याण विभाग, जि.प. नागपूर यांनी नागपूर जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितीमार्फत ग्रा.पं. नी पाठविलेल्या प्रस्तावांना २२ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसहीत निधी प्राप्त करून दिला आहे.

सन २०१९-२० मधील अखर्चित राहिलेला १७ कोटी ५० लाख रुपये व वाढीव निधी ४ कोटी ४५ लक्ष रुपये या प्रमाणे एकूण २२ कोटी ९५ लक्ष रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यतेसह वितरित केला जात आहे. विशेष म्हणजे ४ कोटी ४५ लाखांच्या वाढीव निधीतून ज्या दलित वस्त्यांना आतापर्यंत एकदाही निधी देण्यात आला तेथील कामे केली जातील. यात नागपूरला २ कोटी ५१ लाख १० हजार, कामठी १ कोटी ८० लाख १० हजार, मौदा १ कोटी ५८ लाख ४० हजार, कुही २ कोटी २६ लाख ८० हजार, काटोल २ कोटी ३७ लाख ४ हजार, नरखेड १ कोटी ३७ लाख ८० हजार, कळमेश्वर १ कोटी ३८ लाख ८० हजार, सावनेर १ कोटी ७७ लाख ५० हजार, पारशिवनी १ कोटी ४३ लाख, रामटेक १ कोटी ३२ लाख ६० हजार, भिवापूर १ कोटी ५५ लाख ४० हजार, हिंगणा १ कोटी ५७ लाख ४० हजार, उमरेड १ कोटी ९२ लाख ४० हजार रुपये वितरित केला.

-----------------

Web Title: 22.95 crore Dalitvasti fund distributed