शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

एससी व एसटी तरुणांसाठी २२.५ टक्के पेट्रोल पंप राखीव:  समीर डांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:06 PM

एकूण पेट्रोल पंपांपैकी २२.५ टक्के अर्थात विदर्भातील २६७ पंप एससी व एसटी व्यावसायिकांसाठी राखीव आहेत. वितरण कंपन्यांतर्फे निर्धारित केलेल्या ठिकाणी मालकीच्या जागा असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्या स्थळी लिजवर जागा घेऊन अर्ज करणे शक्य असल्याचे प्रतिपादन बीपीसीएलचे टेरिटोरी व्यवस्थापक समीर डांगे यांनी केले.

ठळक मुद्दे डिक्कीतर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकूण पेट्रोल पंपांपैकी २२.५ टक्के अर्थात विदर्भातील २६७ पंप एससी व एसटी व्यावसायिकांसाठी राखीव आहेत. वितरण कंपन्यांतर्फे निर्धारित केलेल्या ठिकाणी मालकीच्या जागा असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्या स्थळी लिजवर जागा घेऊन अर्ज करणे शक्य असल्याचे प्रतिपादन बीपीसीएलचे टेरिटोरी व्यवस्थापक समीर डांगे यांनी केले.डिक्की विदर्भ चॅप्टर आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) वतीने पेट्रोल पंप डीलर निवड पद्धतीवर वर्धा रोड येथील बानाई हॉलमध्ये आयोजित कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष गोपाल वासनिक, बीपीसीएलचे टेरिटोरी समन्वयक नीलेश लेले, डिक्की विदर्भचे उपाध्यक्ष रुपराज गौरी, व्हर्टिकल हेड प्रदीप मेश्राम, मंगेश डोंगरवार, लेडीज विंगच्या अध्यक्षा विनी मेश्राम उपस्थित होते.समीर डांगे यांनी पेट्रोल पंप वितरणाची कार्यपद्धती आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तरुणांना माहिती दिली.निश्चय शेळके म्हणाले, एससी व एसटी उद्योजक तरुणांसाठी पेट्रोल पंप क्षेत्रात प्रवेश करण्याची उत्तम संधी आहे. याचा तरुणांनी लाभ घ्यावा. गोपाल वासनिक यांनी कार्यशाळा आयोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, पेट्रोल पंपकरिता राखीव कोटा असूनही एससी व एसटी तरुण माहितीच्या अभावामुळे या क्षेत्रात येत नव्हते. एससी व एसटी उद्योजक तरुणांनी या क्षेत्रात यावे, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संचालन प्रदीप मेश्राम यांनी तर रुपराज गौरी यांनी आभार मानले.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीPetrol Pumpपेट्रोल पंप