शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

२२९ पाणी पुरवठा योजनांचे नियोजन

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो.

जिल्हा परिषद : २०१६ पर्यंत सर्व योजना मार्गी लागणार
नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो. पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१६ पर्यंत २२९ योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. यावर ४५कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्र माच्या माध्यमातून या योजना राबविल्या जात आहे. २०१४-१५ या वर्षात १११ तर २०१५-१६ या वर्षात ११८ योजना कार्यान्वित होणार आहे. मे २०१४ पर्यंत यातील ८० योजना पूर्ण झाल्या आहेत. १३ योजनांची कामे प्रगतीपथावर असून जून अखेरीस ९० योजना मार्गी लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांनी दिली.
पुढील वर्षात अपेक्षित असलेल्या १३ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहे. यात कामठी तालुक्यातील चार, पारशिवनी, रामटेक व सावननेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर काटोल, कुही व नागपूर ग्रामीण मधील प्रत्येकी एका योजनेचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शुद्ध व आवश्यक पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेता, ज्या गावात दरडोई ४० लिटर पाण्याचा पुरवठा होत नाही. गावातील जलस्रोत प्रदूषित असेल तर अशा गावांचा राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मात प्राधान्याने समावेश केला जातो.
पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी योजना राबविल्या जात असल्या तरी योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तांत्रिक मान्यतेच्या प्रतीक्षेत योजनांना विलंब होतो. त्यामुळे योजनावरील वाढीव खर्चाला मंजुरी घ्यावी लागते. अनेकदा निधीचा पहिला हप्ता मिळतो. परंतु दुसरा व तिसरा हप्ता वेळेवर मिळत नाही यामुळे योजनांना विलंब होतो. उन्हाळ्यातील टंचाई निवारणासाठी यंदा ३,५०,००००० चे नियोजन करण्यात आले आहे. टँकर व विहीर खोलीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. परंतु कूपनलिका व नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाललेला नाही. (प्रतिनिधी)