२११ नवीन पॉझिटिव्ह, ७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:28+5:302021-02-05T04:55:28+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी २११ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर ७ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे २३८ कोरोना ...

२११ नवीन पॉझिटिव्ह, ७ जणांचा मृत्यू
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी २११ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर ७ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे २३८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १,२७,६३७ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ९४.६० टक्के वर पोहोचला आहे. आतापर्यंत १,३४,९२७ कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली असून ४१७८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरातील १५०, ग्रामीणमधील ५८ आणि जिल्ह्याबाहेरचे ३ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील २ व जिल्ह्याबाहेरचे ३ जण आहेत.चोवीस तासात एकूण ४३०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ३५४४ आणि ग्रामीणचे ७५९ आहेत. आतापर्यंत एकूण १० लाख ७५ हजार ४४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
ॲक्टिव - ३११२
बरे झालेले- १,२७,६३७
मृत- ४१७८