रेल्वेस्थानकावर दारूच्या २१० बॉटल जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:35 IST2020-12-17T04:35:39+5:302020-12-17T04:35:39+5:30
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या अँटी हॉकर्स अँड क्राईम डिटेक्शन टीमने रेल्वेस्थानकावर १७८५० रुपये किमतीच्या २१० दारूच्या बॉटल जप्त ...

रेल्वेस्थानकावर दारूच्या २१० बॉटल जप्त ()
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या अँटी हॉकर्स अँड क्राईम डिटेक्शन टीमने रेल्वेस्थानकावर १७८५० रुपये किमतीच्या २१० दारूच्या बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
आरपीएफचे अँटी हॉकर्स अँड क्राईम डिटेक्शन टीमचे उपनिरीक्षक सचिन दलाल, जवान शाम झाडोकर, राजेश खोब्रागडे यांना बुधवारी प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक ०२५८९ च्या एस ५ कोचमध्ये एक बेवारस बॅग आढळली. या बॅगबाबत आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता कुणीच या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. त्यानंतर ही बॅग आरपीएफ ठाण्यात आणुन पंचासमक्ष उघडली असता त्यात १७८५० रुपये किमतीच्या दारूच्या २१० बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू मध्य प्रदेश येथे तयार केलेली आहे. त्यानंतर आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
.............