शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘मिहान-सेझ’मधील २३ कंपन्यांकडे अडकले २०९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:19 IST

अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली व त्यातून ९२५.१८ कोटींची रक्कम प्राप्त झाली. मात्र ‘सेझ’मधील १७ व ‘नॉन-सेझ’मधील ६ कंपन्यांनी अनुक्रमे १७५.४४ कोटी व ३३.५६ कोटींची रक्कम थकविली आहे.

नागपूर : ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात आतापर्यंत ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली आहे. मात्र, त्यातील सुमारे १९ टक्के म्हणजेच २३ कंपन्यांनी अद्यापही पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यांच्याकडे एकूण २०९ कोटींची रक्कम अडकल्याची बाब माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘एमएडीसी’कडे विचारणा केली होती. ‘मिहान-सेझ’मध्ये किती कंपन्यांनी काम सुरू केले आहे, ज्यांना जागेचे वाटप झाले आहे, मात्र काम सुरू झालेले नाही अशा कंपन्यांवर काय कारवाई झाली तसेच ‘एमएडीसी’मध्ये किती रिक्त जागा आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली व त्यातून ९२५.१८ कोटींची रक्कम प्राप्त झाली. मात्र ‘सेझ’मधील १७ व ‘नॉन-सेझ’मधील ६ कंपन्यांनी अनुक्रमे १७५.४४ कोटी व ३३.५६ कोटींची रक्कम थकविली आहे.सद्य:स्थितीत ‘मिहान’मध्ये ‘सेझ’ व ‘नॉन-सेझ’ मिळून ३२ कंपन्या कार्यरत आहेत. याशिवाय २० नव्या कंपन्यांनी जागा मिळावी यासाठी अर्ज केला आहे, अशीही माहिती देण्यात आली.१५ कंपन्यांना बजावली नोटीसजमीनवाटप होऊनदेखील अनेक कंपन्यांनी काम सुरू केले नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीतर्फे (एमएडीसी) १५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यापैकी १२ कंपन्या ‘मिहान-सेझ’मधील असून, उर्वरित तीन कंपन्या ‘नॉन-सेझ’मधील आहेत.‘पतंजली’चे काम ९० टक्के पूर्ण ‘पतंजली’ समूहाला जमीन देण्यावरून बराच वाद झाला होता. ‘पतंजली’च्या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५०० कोटींच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा उभारली असून, खेळते भांडवल उभारण्याचे काम बँकेकडे अखेरच्या टप्प्यात आहे.

टॅग्स :Mihanमिहान