शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

२०२० पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 21:05 IST

चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण झालेले आहे. नकाशा मंजूर झाला असून स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. २०२० पर्यंत स्मारक उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : इंदू मिलच्या संपूर्ण जागेचे स्मारकासाठी हस्तांतरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण झालेले आहे. नकाशा मंजूर झाला असून स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. २०२० पर्यंत स्मारक उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी संपूर्ण साडेबारा एकर जमीन उपलब्ध झालेली नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. २५ एप्रिल २०१८ ला साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण होऊन त्यावर शासनाच्या नावाची नोंद झाली आहे. यातील पाच एकरातील भाग हा सीआरझेड अंतर्गत येतो, मात्र या परिसरात हे बांधकाम येत नाही. यालाही केंद्र शासनाची मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, स्मारकाचे बांधकाम जोत्यापर्यंत आले आहे. पैशाची कोणतीही अडचण नाही. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात १५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध केला जाईल. स्मारकाचे काम हे आराखड्याप्रमाणे व संकल्पनेनुसार करण्यात येईल.विधिमंडळ सदस्यांपुढे या प्रकल्पाचे सादरीकरण हाईल का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तर भाई जगताप यांनी प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा सादरीकरणात असावा, अशी सूचना केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, विधिमंडळाचे सदस्य आणि सर्व आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांसमोर याबाबत सादरीकरण करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार आणखी बदल करण्यात येईल. शिवाय स्मारकाचे दर्शन सी लिंकवरूनही व्हावे, अशी व्यवस्थाही करण्यात येईल, यासाठी नियमित पाहणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. चर्चेत सदस्य किरण पावसकर, संजय दत्त, अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस