शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

३० पैकी २० उमेदवारांना हजार मतेही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 9:26 PM

नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार उभे होते. सर्वांनीच निवडणुकीत जोर लावला. प्रचार-प्रसार केला. आपल्या विजयाचे दावेही केले. परंतु गुरुवारी जशी मतमोजणी झाली, आश्चर्यचकित करणारे निकाल हाती आले. ३० पैकी २० उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.

ठळक मुद्देनागपूर लोकसभा मतदारसंघ 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार उभे होते. सर्वांनीच निवडणुकीत जोर लावला. प्रचार-प्रसार केला. आपल्या विजयाचे दावेही केले. परंतु गुरुवारी जशी मतमोजणी झाली, आश्चर्यचकित करणारे निकाल हाती आले. ३० पैकी २० उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.यांना मिळाले ५०० पेक्षा कमी मतेदेश जनहित पार्टीच्या दीक्षिता आनंद टेंभुर्णे यांना २७३ मते मिळाली. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रेटिक )च्या डॉ. मनिषा बांगर यांना ४००, सीपीआय (मार्क्सवादी -लेनिनवादी) रेड स्टारचे योगेश कृष्णराव ठाकरे यंना २८१ मते मिळाली. अखिल भारतीय मानवता पार्टीच्या वनिता जितेंद्र राऊत यांना ४८० मते मिळाली. हम भारतीय पार्टीचे विठ्ठल नानाजी गायकवाड यांना ४८२ मते मिळाली. अपक्ष उमेदवारांमध्ये अ‍ॅड. उल्हास शालिकर दुपारे यांना २९९, कार्तिक गेंदालाल डोके यांना १८१, दीपक लक्ष्मणराव मस्के २३५, प्रफुल्ल माणिकचंद भांगे यांना ३५९, प्रभाकर कृष्णाजी सातपैसे यांना १५६, मनोज कोथुजी बावने यांना ३३१, सचिन हरिदास सोमकुंवर यांना २२७, सतीश विठ्ठल निखार यंना २३७, सिद्धार्थ आसाराम कुर्वे यांना २४७ आणि सुनील सूर्यभान कवाडे ४१७ मते मिळाली.१ हजार मतापासून राहिले वंचितबहुजन मुक्ती पार्टीचे अली अशफाक अहमद यांना या निवडणुकीत ७२४ मते मिळाली. मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे असीम अली यांना ६७३ मते मिळाली. अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीचे डॉ. विनोद काशीराम बडोले यांना ३३५ मते मिळाली. रुबेन डोमेनिक फ्रान्सिस यांना ६०८ मते मिळाली तर अपक्ष सचिन जागोराव पाटील यांना ६३३ मते मिळाली.रामटेकची स्थिती चांगलीनागपूर लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत रामटेक लोकसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवार मैदानात होते. परंतु येथील उमेदवारांची स्थिती नागपूरच्या उमेदवारांच्या तुलनेत चांगली राहिली. येथील एकाही उमेदवाराने एक हजारपेक्षा कमी मते घेतली नाहीत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूर