आपली बसच्या चालक व वाहकांचे २० मोबाईल जप्त()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:09+5:302021-02-09T04:10:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपली बसमधील चालक- वाहकांची सोमवारी परिवहन सभापती बाल्या बोलकर यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली. ...

आपली बसच्या चालक व वाहकांचे २० मोबाईल जप्त()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपली बसमधील चालक- वाहकांची सोमवारी परिवहन सभापती बाल्या बोलकर यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली. एकूण २० चालक- वाहकांजवळील अॅन्ड्राॅईड मोबाईल जप्त करण्यात आले. नियमानुसार चालकाला साधा फोन ठेवता येतो. तर वाहकाला फोन जवळ बाळगता येत नाही.
शहरात सध्या २५२ बस धावत आहेत. बसमधील प्रवाशांना सुविधा मिळाव्या, तिकिटांची चोरी थांबावी. यासाठी मनपाने १० भरारी पथक गठित केले आहेत. प्रत्येक पथकात तीन जणांचा समावेश आहे. मनपाच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना दररोज २ तास वेळ द्यावा लागेल. भरारी पथकामार्फत खापरखेडा, कन्हान, बुटीबोरी, कळमेश्वर व हिंगणा मार्गावर बसची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बाल्या बोरकर यांनी दिली.
२८ फेब्रुवारीपर्यंत बसची संख्या पुन्हा वाढविली जाणार आहे. हळहळू परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने चालविली जाणार आहे. मनपाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला.