शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘फेसबुक फ्रेंड’ ठरले अल्पवयीन मुलींसाठी सैतान; नागपुरातील सेमिनरी हिल्स, सदरमध्ये मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 14:59 IST

एका आरोपीला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू

नागपूर : ‘फेसबुक’वर झालेल्या मैत्रीतून दोन तरुणांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले. एका प्रकरणात दिवसाढवळ्या अत्याचार करण्यात आले, तर दुसऱ्या प्रकरणात मुलीचे अपहरण करून अत्याचार झाले. गिट्टीखदान व सेमिनरी हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोन्ही घटना घडल्या आहेत.

सेमिनरी हिल्सच्या परिसरात एका तरुणाने फेसबुक फ्रेंड असलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत शारीरिक अत्याचार केले. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिंगणा येथील अभिषेक प्रेमानंद इंदूरकर (२०) याची १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती. ही मैत्री काही दिवस टिकली. नंतर दोघांमधील बोलणे बंद झाले. रविवारी दुपारी सेमिनरी हिल्स येथील एका धार्मिक ठिकाणी अल्पवयीन मुलगी गेली होती. तिथे तिला अचानक अभिषेक दिसला व त्याला पाहून ती घाबरली. तिने झुडपांच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अभिषेकने तिला जीवे मारण्याची धमकी देत लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

दुपारची वेळ असल्याने तेथे कुणीच नव्हते. हे पाहून अभिषेकने विद्यार्थिनीशी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घरी आल्यानंतर मुलीने झालेली घटना घरच्यांना सांगितली. कुटुंबीय तिला अगोदर जरीपटका पोलीस ठाण्यात घेऊन गेले. घटनेचे ठिकाण सिव्हिल लाइन्स असल्याने त्यांना गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. तक्रारीनंतर पोलिसांनी अभिषेकवर बलात्कार, विनयभंग, पॉक्सो, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

अपहरण करून अत्याचार

दुसऱ्या घटनेत ‘फेसबुक फ्रेंड’ने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी हा १९ वर्षीय तरुण गांधीबाग येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या आईचा एका शिक्षकाशी दुसरा विवाह झाला आहे. या अल्पवयीन मुलीची फेसबुकवरून आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी तरुणाने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वाकी परिसरात नेले. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हे कोणाला सांगू नकोस अशी धमकी दिली.

गेल्या काही दिवसांपासून या अल्पवयीन मुलीची प्रकृती खालावली होती. घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले. तेथे अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फेसबुक आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर