‘ईव्हीएम’विरुद्ध २ला सर्वपक्षीय एल्गार

By admin | Published: February 28, 2017 01:57 AM2017-02-28T01:57:02+5:302017-02-28T01:57:02+5:30

महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे.

2 EVMs against All-Party Elgar | ‘ईव्हीएम’विरुद्ध २ला सर्वपक्षीय एल्गार

‘ईव्हीएम’विरुद्ध २ला सर्वपक्षीय एल्गार

Next

मोर्चा धडकणार : महापालिका निवडणूक रद्द करण्याची मागणी
नागपूर : महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी, यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. याविरोधात लढा उभारण्यासाठी ‘लोकशाही बचोओ’ समिती स्थापन करण्यात आली आहे.
भालदारपुरा येथील केजीएन सभागृहात यासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, मुस्लीम लीग, बहुजन समाज पार्टी, हलबा आघाडी यासह अपक्ष उमेदवार उपस्थित होते. २ मार्चला सकाळी ११ वाजता चिटणीस पार्क ते संविधान चौक असा भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक रद्द करण्याची मागणी करणार आहे.यावेळी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन, शिवसेनेचेसतीश हरडे, तौसिफ खान, किशोर पराते, सुरेश जग्यासी, मिलिंद सोनटक्के, सुशील बालपांडे, रमण ठवकर, अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी पराभूत सदस्यांनी आपली भूमिका मांडली. सबळ पुराव्यानिशी न्यायालयात जाण्यावर चर्चा करण्यात आली. प्रदीप अग्रवाल यांनी कायदेशीर बाजूंची माहिती देऊ न पुराव्यासह न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)


राष्ट्रध्वजाने करणार आंदोलनाची सुरुवात
आंदोलनात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा राहणार नाही. राष्ट्रध्वज हाती घेऊन आंदोलन क रण्यात येणार आहे. यावेळी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, असा सर्वांचा एकच नारा राहणार आहे. कार्यकर्ते आपापल्या भागातून बॅनरसह आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मोजणीत मतदान वाढले
महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ केल्याने अनेक प्रभागात धक्कादायक प्रकार घडले. प्रभाग क्रमांक १ मधील मतदानातील घोळाची सुरेश जग्यासी, माधुरी सोनटक्के, मीना यादव व सूरज आवळे यांनी माहिती दिली. प्रत्यक्षात ३१,११० मतदान झाले असताना मतमोजणीत मात्र ३२,४१७ झाले. १३७० मते कशी वाढली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशिनीवर तीव्र आक्षेप घेऊन या सर्व निवडणुका रद्द करून, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी अतुल सेनाड यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.
अमेरिकासारख्या प्रगत देशाने ईव्हीएम मशीन नाकारून बॅलेट पेपरवरील निवडणूक सुरू केली आहे. मात्र आपल्या देशात अजूनही त्याच ईव्हीएमचा वापर केला जात आहे. फेरनिवडणुकीसंदर्भात निवेदन निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी संजय बारई, महेश महाडिक व सुनील वाघमारे उपस्थित होते.
ईव्हीएममध्ये घोळ
महापालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नितीन नागदेवते यांनी पत्रपरिषदेत केला. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन चुकीच्या क्रमाने लावण्यात आल्या होत्या. नारा येथील मतदान कें द्रावर एक तास ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोळ झाला. तरी ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या या सर्व निवडणुका रद्द करून, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेण्यात याव्या, अशी त्यांनी मागणी केली. अन्यथा आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कविता लांडगे व मनीष बन्सोड उपस्थित होते.

Web Title: 2 EVMs against All-Party Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.