शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'एसबीएल'च्या ९ चुकांचे १९ बळी; एकाच जागी स्फोटकांचा साठा ठेवल्याने स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:34 IST

Nagpur : 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' या कंपनीत स्फोट का झाला याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र, 'पेसो' (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनयाझेशन) व 'डिश'च्या (डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) प्राथमिक अहवालात कंपनीवर ठपका ठेवण्यात आला आहे.

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' या कंपनीत स्फोट का झाला याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र, 'पेसो' (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनयाझेशन) व 'डिश'च्या (डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) प्राथमिक अहवालात कंपनीवर ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनीने 'नोनल क्रिम्पिंग' युनिटमध्ये प्रक्रिया झालेल्या स्फोटकांना तातडीने दुसऱ्या इमारतीत न हलविता तेथेच साठा केला. परिणामी अपघात झाल्यानंतर संपूर्ण इमारतच पत्त्यांप्रमाणे उडली व बेचिराख झाली. सोबतच कंपनीकडून सरकारी नियमांना जागोजागी केराची टोपली दाखवत नऊ प्रकारच्या सुरक्षा नियमांचे थेट उल्लंघन करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

'लोकमत'ला अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'पेसो' व 'डिश'च्या पथकाने स्फोट झाल्यानंतर संपूर्ण घटनास्थळाचे सर्वेक्षण सकाळी ६:३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. रंजना या ७० टक्के भाजल्या होत्या आणि स्फोटामुळे त्यांच्या पायाचे हाड मोडले होते. अतिरक्तस्त्राव आणि 'हायपोव्होल्युमिक शॉक' मुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे.

कामगारांच्या जिवावर उठलेले 'एसबीएल'

'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार 'पेसो' व 'डिश'च्या पथकाने त्यांच्या अहवालात कशा पद्धतीने 'एसबीएल'ने सरकारी नियमांची ऐशीतैशी केली हेच मांडले आहे. जर 'एसबीएल'च्या प्रशासनाने नियमांचे पालन केले असते तर लहानशी ठिणगी उडल्यानंतर इतका मोठा स्फोट झाला नसता.

'पेसो'-'डिश'च्या सूचनांना केराची टोपली

'पेसो' व 'डिश'च्या पथकाने २१ जून २०२४ रोजी 'एसबीएल'चा भेट देत तेथील सुरक्षा यंत्रणांची तपासणी केली होती. त्यात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. पथकाने एसबीएल प्रशासनाला आवश्यक सुधारणा करण्याची सूचना केली होती. मात्र, एसबीएलने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. जर त्यावेळी पावले उचलली असती तर १९ कामगारांचे निश्चितपणे जीव वाचले असते.

कंपनीविरोधातील अहवालातील प्रमुख मुद्दे

  • आग लागल्यानंतर नियंत्रण आणण्यासाठी फायर ट्रेलर पंपच कंपनीत ठेवण्यात आलेला नव्हता.
  • नियमांनुसार दोन सुरक्षा अधिकारी तैनात करणे आवश्यक होते. मात्र, केवळ केदार पंचपुत्रेलाच तैनात करण्यात आले होते.
  • कंपनीत आरोग्य अधिकारीच नेमण्यात आलेले नव्हते.
  • 'डिश'च्या कार्यालयात कामगारांच्या सुट्टया व वेतनाचे तपशील सादर करण्यात आले नव्हते.
  • फ्लेमप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरे कंपनीत लावण्यात आले नव्हते.
  • अंतर्गत सुरक्षा ऑडिट 'डिश' कार्यालयाला सादरच करण्यात आले नव्हते.
  • ८०९ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १८३ जणांसाठीच फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
  • 'डिश'च्या कार्यालयाकडे कामगारांच्या प्रशिक्षणाचे कुठलेही तपशील सादर करण्यात आले नव्हते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : SBL's 9 Negligence Led to 19 Deaths; Explosives Stored Carelessly.

Web Summary : SBL Energy Limited's explosion, claiming 19 lives, stemmed from negligence. Investigations reveal explosives were improperly stored, violating safety norms. A prior inspection flagged issues, ignored by SBL, including the lack of fire safety measures and inadequate safety personnel. This blatant disregard for regulations led to the devastating incident.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी