शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्ननिकेतनसाठी शनिवारी सोडत  ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त

By गणेश हुड | Updated: October 19, 2023 18:30 IST

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूरमहानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे  ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्प  उभारला जात आहे. येथील सदनिकांसाठी  शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ज्या नागरिकांनी विहित मुदतीत नोंदणी शुल्कासह अर्ज सादर केले आहेत, अत्यांनी  संगणकीय सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील मौजा वांजरा येथे मनपाच्या माध्यमातून ‘स्वप्ननिकेतन’ हा  ४८० सदनिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले वनबीएचके सदनिका आहेत. सदनिकेची एकूण बांधकामाची किंमत  ११,५१,८४५ (अंदाजीत) एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे  २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य रु. ९,०१,८४५ रूपये आहे. या व्यतीरिक्त इलेक्ट्रीक मिटर, जीएसटी, रजीस्ट्री किंमत, स्टॅम्प डयुटी, सोसायटी डीपॉझीट, ॲग्रीमेंन्ट सेल डीड करीता अतिरिक्त शुल्क अदा करावे लागेल. सदनिका खरेदी करण्याकरिता ऑनलाईन माध्यमातून मनपाच्या पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूरHomeसुंदर गृहनियोजन