बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीचे १.७५ लाखांचे दागिने, रोख लंपास

By दयानंद पाईकराव | Updated: April 15, 2024 20:48 IST2024-04-15T20:47:28+5:302024-04-15T20:48:02+5:30

अज्ञात आरोपीने घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. 

1.75 lakhs jewellery cash loot of a person who left the village | बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीचे १.७५ लाखांचे दागिने, रोख लंपास

बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीचे १.७५ लाखांचे दागिने, रोख लंपास

नागपूर : बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घराचे कुलुप तोडून रोख व दागीने असा १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरुन नेला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. अंकलेश रमेश भानुसे (३३, रा. सुभाष मेदान, मोहरकर वाडी, पारडी) हे १२ एप्रिलला रात्री ८ वाजता आपल्या घराचा कुलुप लाऊन कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. 

आरोपीने त्यांच्या घरातील लाकडी आलमारीतील सोन्याचे दागीने व रोख ४५ हजार असा एकुण १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी भानुसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: 1.75 lakhs jewellery cash loot of a person who left the village

टॅग्स :nagpurनागपूर