शहरात १७५ हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:39+5:302021-04-17T04:07:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाने रौद्ररूप धारण केले आहे. शहरात वर्तमानात ३९,५१७ रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना ...

175 hotspots in the city | शहरात १७५ हॉटस्पॉट

शहरात १७५ हॉटस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाने रौद्ररूप धारण केले आहे. शहरात वर्तमानात ३९,५१७ रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेत सतरंजीपुरा व गांधीबाग झोन सर्वाधिक बाधित दिसून आले होते. परंतु, दुसऱ्या लाटेत या भागात संक्रमितांची संख्या कमी आहे. वर्तमानात शहरात १७५ हॉटस्पॉट आढळून आले आहेत. यामुळे संबंधित परिसरांना प्रतिबंधित करण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे.

मनपाकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी प्रारंभिक चार झोन अर्थात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर आणि धंतोली झोनमध्ये सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या चार झोनमध्येच जवळपास १०० प्रतिबंधित क्षेत्र आहेत. नेहरूनगर झोनमध्ये वर्तमानात सर्वात कमी ८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून येथील स्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना सजग राहावे लागणार आहे. गांधीबागमध्ये ११, सतरंजीपुरा झोनमध्ये १२ हॉटस्पॉट आहेत. ते सील करण्यात आले आहेत.

शुक्रवारी शहरात ३,७७९ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत आणि ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सतरंजीपुरा झोनमध्ये १०१ संक्रमित आढळले आहेत तर ३ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. हनुमाननगर झोनमध्ये सर्वाधिक ६४७ संक्रमित आढळून आले असून, ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धंतोली, नेहरूनगर व आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक ६-६ मृत्यूंची नोंद झाली आहे. लक्ष्मीनगरमध्ये शुक्रवारी ६२८ संक्रमित तर ३ मृत्यू, धरमपेठ झोनमध्ये ३७५ संक्रमित तर ३ मृत्यू, धंतोली झोनमध्ये ३५५ संक्रमित, नेहरूनगर झोनमध्ये ५७१ संक्रमित, गांधीबाग झोनमध्ये १८६ संक्रमित व २ मृत्यू, लकडगंज झोनमध्ये २८८ संक्रमित व १ मृत्यू, आसीनगर झोनमध्ये २९३ संक्रमित व मंगळवारी झोनमध्ये ३३५ संक्रमित व २ मृत्यूंची नोंद झाली आहे.

------------

बॉक्स...

झोन व प्रतिबंधित क्षेत्र

लक्ष्मीनगर - २३

धरमपेठ - २८

हनुमाननगर - २३

धंतोली - २६

नेहरूनगर - ८

गांधीबाग - ११

सतरंजीपुरा - १२

लकड़गंज - १९

आसीनगर -१४

मंगळवारी - ११

एकूण - १७५

..............

Web Title: 175 hotspots in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.