शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

वन्यप्राण्यांनी घेतले पावणे दोनशे नागरिकांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:25 AM

गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील ४६ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल १७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

ठळक मुद्देराज्यातील मागील ४६ महिन्यांची आकडेवारी : २८ हजारांहून अधिक पशूंचा मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील ४६ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल १७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१६-१७ पासून ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले, पीडित किंवा त्यांच्या नातेवाईकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पशुधनाचे किती प्रमाणात नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांचा बळी गेला. यात ६० महिला तर ११५ पुरुषांचा समावेश होता. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ५३ नागरिकांचा बळी गेला तर २०१९-२० मध्ये १० महिन्यांत ३६ लोक मरण पावले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी १७ कोटी ७० लाख रुपयांची मदत करण्यात आली. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना १० लाख ११ हजार ४२८ रुपयांची मदत मिळाली.२८ हजार पाळीव प्राणी भक्ष्यस्थानी४६ महिन्यांच्या या कालावधीत २८ हजार ८७९ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांची मदत करण्यात आली.वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व मदतवर्ष             मृत्यू        एकूण मदत२०१६-१७    ५३        ४,२४,००,०००२०१७-१८    ५०        ४,००,००,०००२०१८-१९     ३६        ४,०६,००,०००२०१९-२० (जानेवारीपर्यंत) ३६     ५,४०,००,०००पशुधन हानीवर्ष               मृत जनावरे                       नुकसानभरपाई२०१६-१७     ५,९६१                              ३,६७,७६,०००२०१७-१८      ६,९०९                             ५,८४,५९,०००२०१८-१९       ८,३११                              ८,०२,७६,०००२०१९-२० (जानेवारीपर्यंत) ७,७९८        ७,१७,१६,०००

टॅग्स :wildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता