२३ प्रतिष्ठानांना १.७३ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST2021-06-02T04:07:16+5:302021-06-02T04:07:16+5:30

मनपाची कारवाई : ५४ प्रतिष्ठानांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी मंगळवारी २३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ...

1.73 lakh fine to 23 establishments | २३ प्रतिष्ठानांना १.७३ लाखांचा दंड

२३ प्रतिष्ठानांना १.७३ लाखांचा दंड

मनपाची कारवाई : ५४ प्रतिष्ठानांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी मंगळवारी २३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ७३ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५४ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सात प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, धरमपेठमध्ये चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार, धंतोलीच्या पथकाने ९ दुकानांची तपासणी करून १३ हजारांचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये, गांधीबाग येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५५ हजार रुपये, सतरंजीपुरा येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, आशी नगर पथकाने दहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजारांचा, तर मंगळवारी झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोधपथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: 1.73 lakh fine to 23 establishments