कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावावर १७ लाखांनी फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:49 IST2020-10-24T20:47:40+5:302020-10-24T20:49:54+5:30
२० कोटीचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावावर आरोपीने १७ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावावर १७ लाखांनी फसविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २० कोटीचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावावर आरोपीने १७ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्ता पराग दिवाकर भलमे (४९) रा. सोमलवाडा, वर्धा रोड यांनी आरोपी अशरफ अली शेख याच्याशी संपर्क साधून २० कोटी रुपयांच्या लोनसाठी संपर्क केला होता. आरोपीने वेळोवेळी तक्रारकर्त्यास विश्वासात घेऊन १७ लाख २० हजार रुपये घेतले. परंतु कर्ज उपलब्ध करून दिले नाही. सीताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आर्थिक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पेपरच्या गोदामात साडेपाच लाखाची चोरी
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा येथील पेपरच्या गोदामातून ५ लाख ५० हजार ९५६ रुपये किमतीच्या पेपरची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऋषभ आहुजा (२०) रा. कुशीनगर यांचे पेपरचे गोदाम आहे. त्यांच्या गोदामातून १८९ पेपरचे बंडल चोरीला गेले. त्याची किंमत ५ लाख ५० हजार ९५६ रुपये आहे. यासंदर्भात ऋषभ यांनी कपिलनगर पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.