१६ वर्षांपूर्वी फैज फझलची लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत यशस्वी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 11:53 IST2018-01-02T11:47:24+5:302018-01-02T11:53:19+5:30

 ‘रणजी ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. युवा खेळाडूंच्या समुहाने शिस्तबद्ध व निर्धाराने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेटला नवी उंची लाभली.

16 years ago Faiz Fazal was successful in the Cricket tournament organized by Lokmat | १६ वर्षांपूर्वी फैज फझलची लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत यशस्वी कामगिरी

१६ वर्षांपूर्वी फैज फझलची लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत यशस्वी कामगिरी

ठळक मुद्देचॅम्पियन्स घडविण्यात लोकमतचे योगदान

आॅनलाईन लोकमत
नागपूर: ‘रणजी ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. युवा खेळाडूंच्या समुहाने शिस्तबद्ध व निर्धाराने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेटला नवी उंची लाभली. कर्णधार ‘फैज फझल अँड कंपनी’ला सलाम. त्यांच्या कामगिरीमुळे आपली मान उंचावली असून ते प्रशंसेस पात्र आहे. त्यांना प्रशिक्षक चंद्रकांत पंडित व अनुभवी वासिम जाफर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विदर्भ क्रिकेटसाठी हा चमकदार क्षण आहे.

किप इट अप बॉईज.’
फैजची प्रतिभावान कारकीर्द १६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बाबूजींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तर १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे आगळवेगळे आयोजन लोकमत वृत्तपत्र समूहाने केले होते. त्यावेळी फैजसह अनेक युवा खेळाडूंनी स्वत:च्या खेळाची चुणूक दाखविली. आज त्याच फैजच्या नेतृत्वशैलीमुळे विदर्भाने जेतेपदावर नाव कोरले. या कामगिरीमुळे जवाहरलाल दर्डा १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या सुवर्ण स्मृतींना उजाळा लाभला आहे.

-विजय दर्डा, चेअरमन एडिटोरियल बोर्ड, लोकमत

Web Title: 16 years ago Faiz Fazal was successful in the Cricket tournament organized by Lokmat