नागपूर जिल्ह्यात १६ रुग्णांचा मृत्यू, ३६३ पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 21:10 IST2020-11-21T21:10:13+5:302020-11-21T21:10:35+5:30
Nagpur News Corona नागपूर जिल्ह्यात शनिवारी १६ मृत्यू नोंदविण्यात आले. तर ३६३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले.

नागपूर जिल्ह्यात १६ रुग्णांचा मृत्यू, ३६३ पॉझिटीव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३०० च्यावर निघत आहे तर दोन दिवसांपासून मृत्यूचा आकडा दोन अंकावर पोहचला आहे. शुक्रवारी २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला होता. शनिवारी १६ मृत्यू नोंदविण्यात आले. तर ३६३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले.
कोरोनाचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२१ टक्के असले तरी, गेल्या चार दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्हची संख्या बरे होण्याच्या तुलनेत वाढली आहे. शनिवारी ३६३ रुग्णांपैकी ५३ पॉझिटीव्ह ग्रामीण भागात आढळले. ३०५ शहरात आणि ५ जिल्हाबाहेरील रुग्णांची नोंद करण्यात आली. १६ मृतांमध्ये ६ ग्रामीण, ५ शहर व ५ जिल्ह्याबाहेरील आहे. शनिवारी ६८५१ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात २२०० ग्रामीणमध्ये तर ४६५१ शहरातील आहे. २०८ रुग्ण बरे झाले असून, ६३ ग्रामीण आणि १४५ शहरातील आहे. कोरोनाचा आतापर्यंतचा आढावा घेतला असता मृतांची संख्या ३५८६, एकूण पॉझिटिव्ह १०८३६३, बरे झालेले रुग्ण १०१००९ आहे. सध्या ३७६८ रुग्ण अॅक्टिव्ह आहे.