शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

नागपूर शहरात आणखी १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 1:09 AM

शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे.

ठळक मुद्देचाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपाचा महत्वपूर्ण निर्णय : आता ५० केंद्र नागरिकांच्या सेवेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर  : शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे,  या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे.            शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि रोजचा मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.  या सर्व ५०  चाचणी केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेमध्ये काही ठिकाणी ‘आरटीपीसीआर’ आणि ‘अँटीजेन’ चाचणी केली जात आहे. ‘अँटीजेन’ चाचणीचा अहवाल ३० मिनिटांमध्ये माहित होतो. मात्र ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल येण्यासाठी कालावधी लागतो.  ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठीही मनपाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शहरात सध्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची ६ केंद्र असून लवकरच या केंद्रांचीही संख्या वाढविली जाणार आहे.  सध्या नागपूर शहरात दररोज साधारणत: ४००० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या वाढवून दररोज ५ हजार चाचण्या करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची लोक प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये कोरोनाच्या चाचणीची संख्या वाढविण्याची सूचना करण्यात आल्या होत्या.

 नियंत्रण कक्षाचे क्रमांककोरोना चाचणी पॉझीटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि कुठल्या रुग्णालयात बेड्सची उपलब्धता आहे,  हे जाणून घ्यायचे असेल तर ०७१२ - २५६७०२१ या क्रमांकावर संपर्क करावा. कोरोना संदर्भातील इतर मार्गदर्शनासाठी ०७१२-२५५१८६६, ०७१२-२५३२४७४, टोल फ्री नं. १८००२३३३७६४ या क्रमांकावर संपर्क करावे.

 झोन निहाय नवीन कोरोना चाचणी केंद्रआरटीपीसीआर चाचणी केंद्रलक्ष्मीनगर झोन अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस)धरमपेठ झोन अंतर्गत लॉ कॉलेज वसतिगृह, रविभवन, मॉरिस कॉलेज वसतिगृहआसीनगर झोन अंतर्गत पाचपावली पोलीस वसाहतमंगळवारी झोन अंतर्गर प्रभाग क्रमांक १० राजनगर

अँटीजन चाचणी केंद्रलक्ष्मीनगर झोन : जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रधरमपेठ झोन : के.टी.नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय, डिक दवाखाना आणि बुटी दवाखाना.हनुमाननगर : हुडकेश्वर आणि नरसाळा प्राथमिक आरोग्य केदं्र , मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रधंतोली झोन : कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन दवाखाना, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रनेहरूनगर झोन : नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघोरी हेल्थपोस्ट, बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठा ताजबागगांधीबाग : मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आमि नेताजी दवाखाना, डाग्नेटिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, दाजी दवाखाना.सतरंजीपुरा झोन : मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बिनाको फिमेल दवाखाना, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सतरंजीपुरा दवाखाना.लकडगंज झोन : चकोले दवाखाना, डिप्टी सिंग्नल आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह प्राथमिक आरोग्य केंद्रआशीनगर झोन : कपिलनगर आणि शेंडेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, गरीब नवाजनगर, कुंदनलाल गुप्तानगर, बंदे नवाजनगरमंगळवारी झोन : नारा  प्राथमिक आरोग्य कें द्र आणि जरीपटका दवाखाना, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी आणि गोरोवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, सदर रोगनिदान केंद्र

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर