लाहोरीची १६ पेट्या दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:30+5:302020-12-26T04:08:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली पोलिसांनी लाहोरीमधून निघालेली १६ पेट्या दारू जप्त केली. पकडलेल्या दारूची किंमत १ लाख ...

16 boxes of Lahore liquor seized | लाहोरीची १६ पेट्या दारू पकडली

लाहोरीची १६ पेट्या दारू पकडली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाचपावली पोलिसांनी लाहोरीमधून निघालेली १६ पेट्या दारू जप्त केली. पकडलेल्या दारूची किंमत १ लाख २९ हजार रुपये तर ज्या वाहनातून दारूची तस्करी केली जात होती त्याची किंमत ११ लाख रुपये असल्याचे पोलीस सांगतात.

शहरातील विविध भागातून चंद्रपूर, वर्धा या प्रतिबंधित जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. अशीच मोठी खेप गुरुवारी पाचपावलीतून निघणार असल्याची माहिती कळताच पाचपावली पोलिसांनी सापळा लावला. लाहोरी वाईन समोरच पोलिसांनी एमएच ४९- बीबी ७६८६ क्रमांकाचे एसयूव्ही वाहन थांबवले. पोलीस दिसताच विकी भोसले नामक आरोपी पळून गेला. तर, नितीन खडसे नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली. कारमध्ये दारूच्या १६ पेट्या (बॉक्स) आढळल्या. पकडण्यात आलेल्या नितीनने ही दारू लाहोरी वाईन शॉपमधून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीची शहानिशा करण्यात येणार असून त्यासाठी आम्ही चौकशी करीत असल्याचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले.

---

उत्पादन शुल्क विभागाला पत्र

या प्रकरणात दोन आरोपी बनविण्यात आले असून, यात आणखी आरोपी वाढू शकतात. ही दारू लाहोरी वाईन शॉपमधूनच निघाल्याचे आरोपीने सांगितले आहे. मात्र, तो खरा बोलतो की खोटा ते शोधण्यासाठी आम्ही उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिल्याची माहिती ठाणेदार किशोर नगराळे यांनी दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मिळाल्यानंतर ही दारू कोणत्या वाईन शॉप अथवा बारमधून निघाली, ते बॅच नंबरवरून स्पष्ट होईल, असेही नगराळे यांनी स्पष्ट केले.

---

Web Title: 16 boxes of Lahore liquor seized