मास्क न वापरणाऱ्या १५९ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:51+5:302021-02-24T04:09:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या १५९ नागरिकांविरुद्ध कारवाई ...

मास्क न वापरणाऱ्या १५९ नागरिकांना दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या १५९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ७९ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुद्धा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३३,४८४ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ५१ लाख १ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून, कोरोना विषाणूचा संसर्गाचा अद्याप धोका टळला नाही. असे असूनही विनामास्क नागरिक फिरताना दिसतात, ही बाब घातक आहे. पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत १८, धरमपेठ १५, हनुमाननगर १७, धंतोली १०, नेहरूनगर ३४, गांधीबाग १०, सतरंजीपुरा ५, लकडगंज १८, आशीनगर १२, मंगळवारी झोनअंतर्गत १८ आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुद्ध शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.