१५० गावांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:26+5:302021-05-25T04:09:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील १५० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी एनटीपीसी औष्णिक वीज प्रकल्प प्रशासनाने पुढाकार ...

150 villages will get pure drinking water | १५० गावांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

१५० गावांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील १५० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी एनटीपीसी औष्णिक वीज प्रकल्प प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ही सर्व गावे एनटीपीसीच्या कार्यक्षेत्रातील आहेत. त्यासाठी नदी कायाकल्प प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यास तसेच तालुक्यातील जलसंकट दूर हाेण्यास मदत हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय, १५० गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही एनटीपीसी प्रशासनाने स्वीकारली आहे.

नदी कायाकल्प प्रकल्प हा राज्य सरकार, आर्ट ऑफ लिव्हिंग व काही सामाजिक संस्थांच्या मदतीने राबविण्यात येत असल्याचेही एनटीपीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामध्ये माैदा तालुका अग्रणी असून, या तालुक्यात २०१७ मध्ये नदी कायाकल्प प्रकल्प राबवायला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची व्याप्ती ही माैदा, हिंगणा व कामठी तालुक्यातील किमान २०० किमीची आहे. या प्रल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे माैदा तालुक्यातील १५० पेक्षा अधिक गावांच्या जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.

या कामांसाठी करण्यात आलेला संपूर्ण खर्च हा एनटीपीसी प्रशासनाने त्यांच्या सीएसआर फंडातून केला आहे. जलसंधारणची ही कामे करताना पावसाचे पाणी वाहून न जाता ते माेठ्या प्रमाणात जमिनीत झिरपेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा अपव्यय व पावसामुळे हाेणारी जमिनीची धूप थांबण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे, शेतकरी, स्थानिक नागरिकांसह राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती असल्यास तसेच सीएसआर व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास पाण्याची समस्या दूर हाेऊ शकते, असा विश्वास आर्ट ऑफ लिव्हिंगचे संदीप शिरखेडकर यांनी व्यक्त केला.

...

१.७८ काेटी रुपयांचे याेगदान

या प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या व येत असलेल्या कामांसाठी माैदा एनटीपीसी प्रशासनाने १ काेटी ७८ लाख रुपयांचा वाटा उचलला आहे. यातील एक काेटी रुपये या भागातील पाच तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी तर ७८ लाख रुपये इतर कामांसाठी वापरण्यात आलेल्या मशीन, साधने व उपकरणांच्या इंधनासाठी वापरण्यात आले आहे. ते पाच तलाव किमान एक हजार एकर क्षेत्रात विस्तारले आहेत. जमिनीतील पाणी पातळी वाढत असल्याने सिंचनास पाणी मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

...

आम्ही आमच्या प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहाेत. एनटीपीसी मौदा ‘एसओ’ करण्यात आपली भूमिका बजावेल, याची आपल्याला खात्री आहे.

- हरिप्रसाद जोशी, समूह महाव्यवस्थापक,

एनटीपीसी, माैदा.

===Photopath===

240521\img-20210521-wa0015.jpg

===Caption===

150 गावाला देणार शुद्ध पाणी फोटो

Web Title: 150 villages will get pure drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.