१४.२४ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:06+5:302021-02-13T04:10:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. ...

१४.२४ लाखाचा मुद्देमाल जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात ट्रकमधील ५३ गुरांची सुटका करीत चालकास अटक केली व त्याच्याकडून एकूण १४ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ११) करण्यात आली.
अयुब खाॅ शमीद खाॅ पठाण (३२, रा. पिपलाई, ता. राजनवाडी, मध्य प्रदेश) असे अटकेतील ट्रकचालकाचे तर मोहम्मद सिद्दिकी (रा. पवई, जिल्हा विदिशा, मध्य प्रदेश) असे पसार आराेपीचे नाव आहे. रामटेक पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावरील (आमडी, ता. रामटेक) परिसरात नाकाबंदी केली.
यात त्यांनी नागपूरच्या दिशेने जाणारा (एमएच-२४, जे-६०७१) क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये ५३ जनावरे काेंबली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी गुरांसह ट्रक ताब्यात घेत ट्रकचालक अयूब खाॅ शमीद खाॅ पठाण यास अटक केली. या धावपळीत मोहम्मद सिद्दिकी मात्र पळून जाण्यास यशस्वी ठरला.
या कारवाईमध्ये ट्रक व जनावरे असा एकूण १४ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली असून, पसार आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, उपनिरीक्षक प्रमोद राऊत, अंमलदार गोविंद खांडेकर, आकाश शिरसाट, राजू पोले, अतुल बांते, शेंद्रे यांच्या पथकाने केली.