जनता कर्फ्यूमुळे नागपूर विभागातून धावणाऱ्या १४ मेल, एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:17 AM2020-03-22T00:17:17+5:302020-03-22T00:18:49+5:30

नागपूर विभागातून धावणाऱ्या १४ मेल, एक्स्प्रेस गाड्या आणि २१ पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या २२ मार्चला येणार नाहीत.

14 mails, express running from Nagpur region canceled due to Janata curfew | जनता कर्फ्यूमुळे नागपूर विभागातून धावणाऱ्या १४ मेल, एक्स्प्रेस रद्द

जनता कर्फ्यूमुळे नागपूर विभागातून धावणाऱ्या १४ मेल, एक्स्प्रेस रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी २२ मार्चला जनता कर्फ्यूूचे आवाहन केले आहे. यात रेल्वेचाही समावेश असून त्यासाठी मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या १४ मेल, एक्स्प्रेस गाड्या आणि २१ पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या २२ मार्चला येणार नाहीत. या गाड्या नागपूर, अजनी, इतवारीत येणार नसल्यामुळे या स्थानकावरून धावणार नाहीत.
रेल्वे प्रशासनाने २२ मार्चला रद्द केलेल्या रेल्वेगाड्यात नागपूरवरून सुटणारी ११४०२ नंदीग्राम एक्स्प्रेस, २२१३७ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, १२१२० अजनी-अमरावती एक्स्प्रेस, १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस, १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वेगाड्यात १८२३९ गेवरा रोड-इतवारी शिवनाथ एक्स्प्रेस, १८२३७ गेवरा रोड-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस, ११०४० गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराष्ट्र एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. नागपूरमार्गे धावणाºया गाड्यात १२८५९ गीतांजली एक्स्प्रेस, १२८६९ हावडा एक्स्प्रेस, १२४०५ गोंडवाना एक्स्प्रेस आणि १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस रविवारी नागपुरात येणार नाही.

रद्द करण्यात आलेल्या पॅसेंजर
जनता कर्फ्यूसाठी रद्द करण्यात आलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्यात ६११०९ वर्धा-नागपूर पॅसेंजर, ५१२९४ आमला-नागपूर पॅसेंजर, ६८७४३ गोंदिया-इतवारी मेमु, ६८७४४ इतवारी-गोंदिया मेमु रेल्वेगाडी, ५८२०५ रायपूर-इतवारी पॅसेंजर, ५८२०६ इतवारी-रायपूर पॅसेंजर, ५८११९ इतवारी-भिमालगोंडी पॅसेंजर, ५८१२० भिमालगोंडी-इतवारी पॅसेंजर, ५८१२१ इतवारी-केळवद पॅसेंजर, ५८१२२ केळवद-इतवारी पॅसेंजर, ५८८१२ इतवारी-टाटानगर पॅसेंजर, ६८७१३ गोंदिया-इतवारी मेमु, ६८७४१ इतवारी-बालाघाट मेमु, ६८७१५ बालाघाट-इतवारी मेमु, ६८७५४ इतवारी-रामटेक मेमु, ६८७५५ रामटेक-नागपूर मेमु, ६८७५६ नागपूर-रामटेक मेमु, ६८७५१ रामटेक-इतवारी मेमु
६८७५२ इतवारी-रामटेक मेमु, ६८७५३ रामटेक-इतवारी मेमु, ६८७१६ इतवारी-गोंदिया मेमु या गाड्यांचा समावेश आहे.

२३ मार्चला नागपुरला न येणाऱ्या गाड्या
२२ मार्चला रद्द केल्यामुळे २३ मार्चला नागपुरात न येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२२६१ हावडा दुरांतो, १२१०५ विदर्भ एक्स्प्रेस, १२१४५ भुवनेश्वर एक्स्प्रेस, १८०२९ कुर्ला एक्स्प्रेस, ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस, १२१२९ आझादहिंद एक्स्प्रेस आणि १२८०९ मुंबई-हावडा मेलचा समावेश आहे.

प्रवाशांच्या कमी संख्येमुळे रद्द केलेल्या गाड्या
प्रवाशांची संख्या घटल्यामुळे काही गाड्यांना रद्द करण्यात आले आहे. यात २२८६६ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस २४ आणि ३१ मार्चला, २२८६५ लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस-पुरी एक्स्प्रेस २६ मार्च आणि २ एप्रिलला, १८४०७ पुरी-शिर्डी साईनगर एक्स्प्रेस २७ मार्च, १८४०८ शिर्डी साईनगर-पुरी एक्स्प्रेस २२ आणि २९ मार्च, २२८४७ विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस २२ आणि २९ मार्च, २२८४८ लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टनम २४ आणि ३१ मार्च, १७००७ सिकंदराबाद-दरभंगा एक्स्प्रेस २१ मार्च, १७००६ दरभंगा-सिकंदराबाद एक्स्प्रेस ३ एप्रिल, १२४३७ सिकंदराबाद-निजामुद्दीन एक्स्प्रेस २५ मार्च आणि १ एप्रिलला, १२४३८ निजामुद्दीन-सिकंदराबाद एक्स्प्रेस २२ आणि २९ मार्चला, १४८१५ भगत की कोठी-तांबरम एक्स्प्रेस २५ आणि ३१ मार्चला, १९६०४ रामेश्वरम-अजमेर एक्स्प्रेस २४ आणि ३१ मार्चला आपल्या मुळ स्थानकावरुन सुटणार नाही.

Web Title: 14 mails, express running from Nagpur region canceled due to Janata curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.