मास्कशिवाय फिरणाऱ्या १३ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST2021-05-26T04:09:50+5:302021-05-26T04:09:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १३ नागरिकांकडून ६ हजार ...

13 fined for walking without mask | मास्कशिवाय फिरणाऱ्या १३ जणांना दंड

मास्कशिवाय फिरणाऱ्या १३ जणांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १३ नागरिकांकडून ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३८१३१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७४ लाख २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्गाचा अद्यापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरताना दिसतात, ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे अशाप्रकारे बेजबाबदार नागरिकांवर शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जात आहे.

Web Title: 13 fined for walking without mask