शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

विशाखापट्टणमहून आणला १२८ मीटर पंचशील ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 20:07 IST

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चेन्नई आणि विशाखापट्टणमच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन अर्पण केले. डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीला सलाम करीत १२८ मीटर लांब पंचशील ध्वज विशाखापट्टणमवरून आणण्यात आला व या कार्यकर्त्यांनी या विशाल पंचशील ध्वजाने दीक्षाभूमीला अभिवादन केले.

ठळक मुद्देबुद्धिस्ट सोसायटीच्या २६८ कार्यकर्त्यांचे अभिवादन : संविधान चौक ते दीक्षाभूमी रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चेन्नई आणि विशाखापट्टणमच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन अर्पण केले. डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीला सलाम करीत १२८ मीटर लांब पंचशील ध्वज विशाखापट्टणमवरून आणण्यात आला व या कार्यकर्त्यांनी या विशाल पंचशील ध्वजाने दीक्षाभूमीला अभिवादन केले.विशाल पंचशील ध्वजासह अभिवादन रॅलीचे नेतृत्व एम. राजू हे करीत होते. विशाखापट्टणमचे ६८ आणि चेन्नईच्या २०० कार्यकर्त्यांनी जून महिन्यापासूनच याची तयारी सुरू केली होती. जूनमध्ये रेल्वेचे आरक्षण करण्यात आले. विशाखापट्टणममध्ये हा विशाल ध्वज तयार करण्यात आला. त्यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीपासून हे अभियान सुरू करण्यात आले. प्रत्येक जयंतीला ध्वजाची एक मीटरने वाढ करण्यात आली आणि दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यावेळी ते दीक्षाभूमीवर आणण्यात येते. यावर्षीही हे अभिवादन अभियान आयोजिले गेले. संविधान चौकातून हा विशाल ध्वज खांद्यावर घेऊन रॅली काढण्यात आली. यामध्ये समता सैनिक दलाचेही शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. डॉ. आंबेडकर व तथागत बुद्धांचा जयघोष करीत ही रॅली दीक्षाभूमीवर पोहचली. यानंतर समता सैनिक दलाद्वारे परेड मार्च करीत सलामी देण्यात आली. १२८ मीटर ध्वजासह परेडद्वारे अभिवादनाचा हा सोहळा हजारो लोकांनी अनुभवला. सर्वत्र धम्मचक्राचा एकच जयघोष निनादला. बुद्धिस्ट सोसायटीचे के. सत्यनारायणा, अ‍ॅड. एम. गौतमी, के. व्यंकटेश्वरी लक्ष्मी, उमा माहेश्वरी आदींनी या अभिवादन अभियानाचे नेतृत्व केले. विशाखापट्टणमच्या टीममध्ये २५ महिलांचाही समावेश होता. अनुयायांसाठी हा पंचशील ध्वज परेड सोहळा डोळ्यांना सुखावणारा ठरला. डॉ. बाबासाहेब यांच्या १५० जयंतीपर्यंत याचप्रकारे ध्वज अभिवादन करण्यात येणार असल्याचे एम. राजू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी