शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

 मनपाच्या अभय योजनेत १२.६३ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 22:10 IST

Corporation's Abhay Yojana, nagpur news मनपा प्रशासनाने मालमत्ता व पाणीकराची थकबाकी वसुलीसाठी अभय योजना सुरू केली आहे. गेल्या सात दिवसात थकीत मालमत्ता कराच्या ५६० कोटीपैकी ११.५० कोटी तर पाण्याच्या १०१.४३ कोटीपैकी तीन दिवसात ६३ लाखाची वसुली झाली आहे.

ठळक मुद्देमालमत्ता व पाणीकर वसुलीला अपेक्षित प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाने मालमत्ता व पाणीकराची थकबाकी वसुलीसाठी अभय योजना सुरू केली आहे. गेल्या सात दिवसात थकीत मालमत्ता कराच्या ५६० कोटीपैकी ११.५० कोटी तर पाण्याच्या १०१.४३ कोटीपैकी तीन दिवसात ६३ लाखाची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी जनजागृतीत कमी पडल्याने योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही.

अभय योजनेंतर्गत मालमत्ता व पाणीकरधारकांना ८० आणि ५० टक्के दंड माफीचा लाभ मिळणार आहे. ही योजना १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान राबविण्यात येणार आहे. १५ डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात महापालिकेच्या खात्यामध्ये ११.५० कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. त्यामध्ये ४ हजार २४८ करदात्यांनी ४.८९ कोटी रुपये जमा करून १.४८ कोटी रुपये दंड माफ करून या योजनेचा फायदा घेतला आहे. मालमत्तासोबत पाणीकराची अभय योजनेंतर्गत २१ डिसेंबरपासून वसुली सुरू झाली असून, २ हजार ३२२ नागरिकांनी ६३.२१ लाख रुपये कर भरला आहे. शहरात ६ लाख ३५ हजार ९९५ मालमत्ता असून, त्यात ५ लाख ३१ हजार ८२२ इमारत व १ लाख ४ लाख १७३ भूखंड आहेत. थकीत रकमेवरील व्याजाची रक्कम १५७ कोटी आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर