शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:24 IST

मंत्री उदय सामंत, अतुल सावे यांचेही अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर/मुंबई: विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नागपूर शहरातील तीन उमेदवारांनी शुक्रवारी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी ‘रॅली’ काढून महायुतीने शक्तिप्रदर्शन केले.

सकाळी फडणवीस व गडकरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर ‘रॅली’ सुरू झाली. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ‘रॅली’ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. त्यानंतर निवडक नेत्यांसह फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर दक्षिण नागपूर मतदारसंघाचे उमेदवार मोहन मते व पूर्व नागपूर मतदारसंघाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले.

पिक्चर अभी बाकी हैं...

नागपुरात मागील १० वर्षांत बराच विकास झाला आहे. आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी हैं, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्याअगोदर फडणवीस यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी सपत्नीक भेट दिली. त्यावेळी कांचन गडकरींनी फडणवीस यांचे औक्षण केले.

यांचेही अर्ज दाखल

मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमधून, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

महायुतीच सत्तेवर येणार; फडणवीसांचा दावा

  • गेली २५ वर्षे विधान मंडळाचा सदस्य म्हणून जनतेने माझे काम पाहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने जे काम केलेले आहे त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळेल व पुन्हा एकदा महायुती सत्तेवर येईल हा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 
  • नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत मांडलेल्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केले. नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षणविरोधी भूमिका मांडतात आणि त्याचे पटोले समर्थन करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. 
  • काँग्रेसने नेहमी बाबासाहेब आंबेडकर व आरक्षणाचा विरोध केला आहे. जोपर्यंत भारतीय संविधान आणि देशात भाजप आहे तोपर्यंत आरक्षण कोणीही संपवणार नाही. पटोले हे माझे मित्र आहेत, परंतु ते कुठल्या सर्कसमधले आहेत, हेदेखील मला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे