शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

उपराजधानीत चार आठवड्यात कोरोना रुग्णांसाठी १२०० खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 10:33 AM

कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मेयो व मेडिकलला तातडीने ‘आयसीयू’ व ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) तयार करण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार मेयोने १६० खाटांचे आयसीयू’ व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ तर मेडिकलने २०० खाटांचे आयसीयू व ४०० खाटांचे ‘एचडीयू’ असे एकूण १२०० खाटांचे नियोजन केले होते.

ठळक मुद्दे३५ कोटीला मंजुरीमेयो, मेडिकलमध्ये ३६० खाटांचे आयसीयू तर ८४० हाय डिपेंडन्सी युनिट

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून शासनाने या पूर्वीच मेयो व मेडिकलला तातडीने ‘आयसीयू’ व ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) तयार करण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार मेयोने १६० खाटांचे आयसीयू’ व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ तर मेडिकलने २०० खाटांचे आयसीयू व ४०० खाटांचे ‘एचडीयू’ असे एकूण १२०० खाटांचे नियोजन केले होते. शासनाने याला तातडीने मंजुरी देत ३५ कोटींमधून शनिवारी २८ कोटी उपलब्ध करून दिले. पुढील चार आठवड्यात हे दोन्ही विभाग रुग्णसेवेत असण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा या तिसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या वाढतानाही दिसून येत आहे. एकूण कोरोना रुग्णाच्या संख्येत देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शहरात नागपूर पाचमध्ये आहे. यामुळे नियोजनाच्या दृष्टीने वेगाने पावले उचलली जात आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे, शासनाने कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी शनिवारी ३५ कोटींना मंजुरी दिली. यातील २५ कोटी ‘बीडीएस’वर उपलब्धही करून दिले. तीन मजल्याच्या इमारतीत मेडिकलचे ‘आयसीयू’मेडिकलचा स्त्री रोग व प्रसुती विभाग, बालरोग विभाग व मेडिसन विभागासाठी प्रस्तावित आयसीयूची इमारत तयार आहे. परंतु यंत्रसामुग्री अभावी बंद आहे. आता या इमारतीचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी होणार आहे. या इमारतीत २०० खाटांचे आयसीयू असणार आहे. तर वॉर्ड क्र. २५, वॉर्ड क्र. ४९, वॉर्ड क्र. १, २ व ३ मिळून ४०० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला जाणार आहे. मेयोमध्ये सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये आयसीयू मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी सांगितले, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये १६० खाटांचे आयसीयू तर ४४० खाटांचे ‘एचडीयू’ असणार आहे. मेयो, मेडिकलच्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरपासून ते ऑक्सिजनची सोय असणार आहे. या कार्याला शनिवारपासूनच गती देण्यात आली आहे.कमीत कमी दिवसात आयसीयू व एचडीयू उभे करायचे आहे. शासनाने खबरदारीचे उपाय म्हणून मेयो, मेडिकलमध्ये ‘आयसीय’ू व ‘एचडीयू’ उभारण्याने निर्देश दिले होते. त्यानुसार तातडीने नियोजन करण्यात आले आहे. मेडिकलमध्ये २०० खाटांचे ‘आयसीय’ू व ४०० खाटांचे ‘एचडीयू’ तर मेयोमध्ये १६० खाटांचे ‘आयसीयू’ व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ उभे केले जाणार आहे. कमीतकमी दिवसात हे दोन्ही विभाग रुग्णसेवेत असणार आहे.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल 

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस