१२ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:51+5:302021-01-13T04:18:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : पाेलिसांनी गाेसेवाडी (ता. सावनेर) शिवारातील कन्हान नदीच्या परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक ...

१२ लाखाचा मुद्देमाल जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : पाेलिसांनी गाेसेवाडी (ता. सावनेर) शिवारातील कन्हान नदीच्या परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात दाेघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ९) दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
गाेसेवाडी परिसरातून रेतीची वाहतूक केेली जात असल्याची माहिती मिळताच, पाेलिसांनी या शिवारातील कन्हान नदीच्या परिसराची पाहणी केली. यात त्यांना एमएच-४०/एन-७५७७ क्रमांकाचा ट्रक नदीच्या पात्राकडून येत असल्याचे आढळून आले. त्यांनी हा ट्रक मध्येच थांबवून झडती घेतली. त्यात रेती असल्याचे निदर्शनास येताच पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती रेती विना राॅयल्टी वाहून नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.
परिणामी, पाेलिसांनी ट्रकचालक दीपक पुरुषोत्तम पंचवटे (३५) व पवन धनकर दाेघेही रा. महादुला यांना ताब्यात घेतले. शिवाय, त्यांच्याकडून १२ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि सहा हजार रुपयाची रेती असा एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती खाप्याचे ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. याप्रकरणी खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.