शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

१२ ई-रिक्षा जप्त : आरटीओची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 10:42 PM

बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षाचा कालावधी लोटला असलातरी नागपुरात केवळ ५००वर ई-रिक्षांची नोंदणी झालेली नाही. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आपल्या विशेष पथकाच्या मदतीने ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेत १२ ई-रिक्षा जप्त केल्या.

ठळक मुद्देनोंदणी नसणाऱ्यांना साडेचार हजार रुपयांपर्यंतचा दंडलोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षाचा कालावधी लोटला असलातरी नागपुरात केवळ ५००वर ई-रिक्षांची नोंदणी झालेली नाही. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आपल्या विशेष पथकाच्या मदतीने ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेत १२ ई-रिक्षा जप्त केल्या. या तपासणी मोहिमेला आणखी गती देण्यात येईल, असेही या कार्यालयाचे म्हणणे आहे.शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासीयांना स्वस्तात वाहतूक सुविधा मिळवून देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या ई-रिक्षाला २०१६ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. त्या पूर्वीही हजारावर ई-रिक्षा उपराजधानीत धावत होत्या. मंजुरी मिळाल्यानंतर यात दुपटीने वाढ झाली. सध्याच्या स्थितीत आठवड्याभरात दोन नव्या ई-रिक्षा रस्त्यावर येत आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. असे असताना, ई-रिक्षाच्या नोंदणीविषयी उदासीनता होती. नुकतचे ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यांत नोंदणी करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २४ जानेवारी रोजी राज्य शासनाला दिला. परंतु त्यानंतरही आरटीओ कार्यालयांमध्ये ई-रिक्षांच्या नोंदणीचा आकडा वाढला नव्हता. नागपूर शहर आरटीओ कार्यालयात साधारण ५० तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर येथे ४५० ई-रिक्षांची नोंदणी झाली. यावरून सध्याच्या घडीला अडीच हजारावर ई-रिक्षा अवैधपणे रस्त्यावर धावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. याची दखल शहर आरटीओ कार्यालयाने घेऊन ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेतली. यातील नोंदणी नसलेल्या १२ ई-रिक्षा जप्त केल्या.चालकांचे धाबे दणाणलेनोंदणी नसलेल्या ई-रिक्षांना थेट जप्त करण्याची मोहीमच आरटीओने हाती घेतल्याने चालकांचे धाबे दणाणले आहेत. संपूर्ण दंड भरून नोंदणी केल्यावरच वाहनांना सोडण्यात येत आहे. ई-रिक्षाची नोंदणी नसल्यास २ हजार रुपये दंड, विमा नसल्यास २ हजार दंड व इतरही दंड मिळून असे साडेचार ते पाच हजारांचा दंड वाहनचालकांवर पडत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर