शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात 12 कोटीवर फटाके ; ९० टक्के फटाके शिवकाशीवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:46 IST

Fire crackers Nagpur News नागपूर शहरात सुमारे १० ते १२ कोटीचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात बहुसंख्य ग्रीन फटाके आहेत.

ठळक मुद्देठोक विक्रेत्यांकडे आले ग्रीन फटाके

  सुमेध वाघमारे    लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीचा सण सहा दिवसावर येऊन ठेपला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. शहरात सुमारे १० ते १२ कोटीचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात बहुसंख्य ग्रीन फटाके आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी फटाक्याच्या मागणीत ५० टक्क्याने घट आल्याचे खुद्द ठोक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्यांना त्रास होण्याची भीती,  फटाक्याविरुद्ध पर्यावरणप्रेमींची जनजागृती, दरात वाढ व फार कमी किरकोळ दुकानांना मिळालेली मंजुरी आदी कारणांमुळे यावर्षी फटाक्याचा बार ‘फुसका’ निघण्याची शक्यता आहे. एकट्या गांधीबागसारख्या फटाका बाजारात ५०० वर फटाक्याची दुकाने लागायची, ती आता १५० वर आली आहे. कोरोनामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे ठोक फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

15 कोटीच्यावर व्यवसाय

ठोक विक्रेत्यांनी सांगितले, फटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, पावडर, कॉपरकोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी, अशा कच्च्या मालाची आवश्यकता असते. यंदा या सर्व कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत. यातच तयार फटाक्यावर २८ टक्के जीएसटी आहे. परिणामी, फटाक्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी साधारण फटाक्याचा बाजार साधारण १५ कोटीचा होता. यावर्षी तो आणखी कमी होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात ९० टक्के  फटाके शिवाकाशीवरून येतात. 

५८२ व्यावसायिकांना ना-हरकत प्रमाणपत्र

यावर्षी शहरातील ९ अग्निशमन केंद्रातून ५८२ व्यावसायिकांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. स्थायी दुकाने लावण्यासाठी अग्निशमन विभागाची परवानगी लागते. अग्निशमन विभागाद्वारे १ हजार रुपये शुल्क तसेच पर्यावरण शुल्क म्हणून ३ हजार रुपये आकारण्यात येत आहे. गेल्या वर्षी ७५२ दुकानांना परवानगी देण्यात आली होती. पोलीस विभागाकडून अंतिम मंजुरी व परवाना दिला जातो. १५ दिवसासाठी दुकानांना परवानगी असते. 

टॅग्स :fire crackerफटाके