शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

धक्कादायक! ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, १० नराधमांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 13:55 IST

उमरेड हत्याकांडानंतर उजेडात आली धक्कादायक माहिती

उमरेड (नागपूर) : इतवारी पेठ परिसरात शुभम ऊर्फ गोलू भोजराज दमडू (२५) याचा हकनाक बळी गेल्यानंतर पोलीस तपासात एका अकरावर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. साधारणत: एक महिन्यापूर्वी तसेच पंधरा दिवसांपूर्वी असे दोन वेगवेगळ्या दिवशी हे अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

शुभम दमडू खून प्रकरणाचा मुख्य आरोपी असलेल्या रोशन सदाशिव कारगावकर (२९, रा. इतवारी पेठ, उमरेड) याच्यासह गजानन दामोधर मुरूसकर (४०), प्रेमदास जागोबा गाठीबांधे (३८), राकेश शंकर महाकाळकर (२४), मयूर भास्कर दलाल (२१) सर्व रा. इतवारी पेठ, उमरेड तसेच गोविंद गुलाब नटे (२२), निखिल विनायक नरुले (२४), सौरभ उत्तम रिठे (२२), नीतेश अरुण फुकट (३०), प्रद्युम्न दिलीप करूटकर (२२) सर्व रा. रानबोडी पुर्नवसन, उमरेड अशी दहा आरोपींची नावे आहेत.

शुभम हत्याकांडाचा आरोपी असलेला रोशन कारगावकर हा मुलीच्या अत्याचार प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. त्याने दोन वेगवेगळ्या दिवशी आरोपींना आपल्या राहत्या घरी बोलावले. त्यांच्याकडून काही रक्कम घेतली. त्या मोबदल्यात अकरा वर्षीय मुलीचा शरीरसुखासाठी वापर करून घेतला. अत्याचाराबाबत कुणाकडे सांगितल्यास तुला ठार मारू, अशी ध मकीसुद्धा तो मुलीला देत होता. तो वेळावेळी मुलीला घरी बोलायचा. तिच्यावर अत्याचार करायचा, अशाही बाबी तपासात पुढे आल्या आहेत. 

काल मंगळवारी दिवसभर पोलिसांनी महिला सामाजिक कार्यकर्त्यांचीसुद्धा मदत घेतली. त्यानंतर मुलीस नागपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. आज बुधवारी सकाळच्या सुमारास वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

पोक्सो न्यायालयात हजर

मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची कारवाई पोक्सो सहकलम ६ अन्वये करण्यात आली. यासाठी आरोपींना नागपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या ठिकाणी रोशन कारगावकर वगळता अन्य नऊ आरोपींना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुभम दमडू हत्याकांडातील आरोपी असलेल्या रोशन आणि बाल्या ऊर्फ बादल मोरेश्वर लेंडे (२४, रा. आमगाव देवळी) या दोन आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासाची सूत्रे गायकवाड यांच्याकडे

मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड करीत आहेत. याप्रकरणी ३७६ (डीबी), ३७६(२) (एन), ५०६ आयपीसाी, ५ (जी), (एल), (एम), पोक्सो सहकलम ६ अन्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPOCSO Actपॉक्सो कायदाumred-acउमरेड