शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात आरटीईच्या अडचणींवर ११ कोटीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:37 IST

शासनाने जिल्ह्यातील शाळांच्या परताव्याचे ११ कोटी रुपये मंजूर केले आहे. शिवाय शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढसुद्धा दिली आहे.

ठळक मुद्देनोंदणीसाठी शाळांना मिळाली मुदतवाढ : शेवटच्या दिवशी ४१२ शाळांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षांपासून शासनाकडे थकीत असलेला आरटीईचा परतावा शाळांना न मिळाल्याने शैक्षणिक सत्र २०१८ मध्ये आरटीईत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा नाही, असा इशारा शाळांनी दिला होता. त्याचबरोबर शाळांनी आरटीईच्या नोंदणी प्रक्रियेतही अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विहीत मुदतीत केवळ ४१२ शाळांचीच नोंदणी होऊ शकली. शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्ह्याचा कोटा कमी झाला होता. शिक्षण विभाग अडचणीत आला होता. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील शाळांच्या परताव्याचे ११ कोटी रुपये मंजूर केले आहे. शिवाय शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढसुद्धा दिली आहे.नागपूर जिल्ह्यात २०१२ पासून आरटीई अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत दरवर्षी शाळांची संख्या वाढतच गेली. २०१३-१४ मध्ये ४९१, २०१४-१५ मध्ये ४९८, २०१५-१६ मध्ये ५६० व २०१६-१७ मध्ये ५९५ शाळांनी आरटीईत नोंदणी केली होती. शाळांना या चारही वर्षाचा परतावा शासनाकडून मिळालेला नाही. परताव्याचे जवळपास ४५ कोटी रुपये शासनावर थकीत आहे. परताव्यासाठी संघटनांनी शिक्षणमंत्र्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन दिले. परंतु त्याचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संघटनांनी सत्र २०१८-१९ यामध्ये आरटीईच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास निरुत्साह दाखविला. त्याचा परिणाम शाळांच्या नोंदणीवर झाला. प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांवर दबाव वाढला होता. शाळा व्यवस्थापकांच्या संघटनांनी बहिष्कार घालण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला होता. अखेर शासनाने जिल्ह्यासाठी ११ कोटी रुपये मंजूर केले आहे. आता नोंदणीसाठी शाळांकडून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा शिक्षण अधिकाऱ्यांना आहे. त्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढसुद्धा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नवीन वेळापत्रक लवकरचशाळांची नोंदणी झाल्यानंतर जिल्ह्याचा कोटा ठरविण्यात येईल. त्यानंतर पालकांना आरटीई अंतर्गत नोंदणी करायची आहे. आरटीईच्या प्रक्रियेसंदर्भात पहिल्यांदा जे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यात २३ जानेवारीपासून पालकांना अर्ज भरता येणार होता. परंतु आता शाळा नोंदणीला मुदतवाढ दिल्याने, नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकnagpurनागपूर