शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील ११ सीडीपीओ निलंबित

By गणेश हुड | Updated: June 7, 2024 19:08 IST

अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळा : प्रथमच एकाचवेळी ११ जणांवर निलंबन कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  श्रेणिवर्धन योजनेच्या निधीतून जिल्ह्यातील अंगणवाड्यांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य वाटपात ८४ लाखांचा  घोटाळा झाला आहे. या प्रकरणात ११  प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी ( सीडीपीओ)  यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी गुरुवारी जारी केले आहे. एकाचवेळी तब्बल ११ अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई होण्याची ही नागपूर जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याने कर्मचारी व अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सीडीपीओ यांच्याविरोधात समिती स्तरावर आधिच पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

साहित्य घोटाळ्यात जिल्ह्यातील सर्व १३ पंचायत समिती स्तरावरील  प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु चौकशी दरम्यान एक प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सेवानिवृत्त झाल्या असून एका प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दोन ठिकाणचा प्रभार असल्याने ११ अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.  अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासोबत डागडुजी, बांधकाम, सौर प्रकल्प, दरवाजे, खिडकी आदींसोबत पिण्याच्या पाण्याची सोय, बेबी फ्रेंडली शौचालय, सुरक्षाभिंत आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते. या कामासाठी दोन टप्प्यांत एक कोटी सहा लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. हा सर्व निधी पंचायत समितीस्तरावरील सीडीपीओ यांच्या खात्यात वळता करण्यात आला. सीडीपीओंनी कोटेशन मागवून पुरवठादार निश्चित केले. सीडीपीओंनी शासनाने प्राधान्यक्रमाने करायची कामे व साहित्य सोडून अन्य साहित्य पुरविल्याचे सकृत दर्शनी दिसते. पुरवठादार सोयीस्कर ठरेल, अशी प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावतीanganewadi jatraआंगणेवाडी