Corona Virus in Nagpur; नागपुरातील ८ संशयित डॉक्टरांना दिलासा; १०६ नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:06 IST2020-03-31T13:06:04+5:302020-03-31T13:06:43+5:30
मेडिकलच्या आठ डॉक्टरांसह चार पॅरामेडिकल स्टाफचेही नमुने घेण्यात आले होते. हे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Corona Virus in Nagpur; नागपुरातील ८ संशयित डॉक्टरांना दिलासा; १०६ नमुने निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सोमवारी पहाटे दोन रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णाने आपला भाऊ पॉझिटिव्ह असल्याची बाब लपविली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या मेडिकलच्या आठ डॉक्टरांसह चार पॅरामेडिकल स्टाफचेही नमुने घेण्यात आले होते. हे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच नागपुरातील १०६ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
सोमवारी नागपुरात एका रुग्णाचे न्युमोनियामुळे निधन झाले होते.