विद्यापीठात २९ परीक्षांचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST2021-01-09T04:07:21+5:302021-01-09T04:07:21+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी यंदाच्या उन्हाळी परीक्षा ऐतिहासिक ठरल्या. एरवी विद्यापीठाच्या बहुतांश परीक्षांत ‘सेंट परसेंट’ निकाल ...

विद्यापीठात २९ परीक्षांचा निकाल १०० टक्के
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी यंदाच्या उन्हाळी परीक्षा ऐतिहासिक ठरल्या. एरवी विद्यापीठाच्या बहुतांश परीक्षांत ‘सेंट परसेंट’ निकाल लागत नाही. मात्र यंदा २०३ परीक्षांपैकी २९ म्हणजेच १४.२८ टक्के परीक्षांचा निकाल १०० टक्के इतका लागला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. उन्हाळी परीक्षांमध्ये एकूण किती विषयांच्या परीक्षा झाल्या, त्यात किती विद्यार्थी बसले व किती उत्तीर्ण झाले व किती विषयांचा निकाल १०० टक्के लागला हे प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार विद्यापीठाने ‘ऑनलाईन’ माध्यमातून २०३ परीक्षा घेतल्या. ६९ हजार ९८८ विद्यार्थ्यांनी परीक्षांसाठी अर्ज केला होता व त्यातील ६६ हजार ९९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २ हजार २९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ५२ हजार ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची टक्केवारी ७७ टक्के इतकी होती.