सपा-बसपाचे १00 आमदार भाजपच्या संपर्कात
By Admin | Updated: May 10, 2014 01:30 IST2014-05-10T01:30:40+5:302014-05-10T01:30:40+5:30
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे १00 आमदार संपर्कात असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते भाजपात प्रवेश घेतील, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी शुक्र वारी केला.

सपा-बसपाचे १00 आमदार भाजपच्या संपर्कात
उमा भारती यांचा दावा : पवार सत्तेसोबत असतात
नागपूर : समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे १00 आमदार संपर्कात असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते भाजपात प्रवेश घेतील, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी शुक्र वारी केला.
उमा भारती यांनी शुक्रवारी नागपुरात येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, १६ मे च्या मतमोजणीनतंर देशातील चित्र स्पष्ट होईल. अमेठीतून निवडणूक लढवित असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. बनारस येथील पक्ष कार्यालयात येथील नरेंद्र मोदी यांनी केलेल्या गंगा पूजनावर काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत त्या म्हणाल्या, काँग्रेसने आजवर पापच केले आहे. त्यांना पाप धुवायला गंगा देखील अपुरी पडेल. अशा लोकांनी या विषयी न बोलले बरे, असा टोला त्यांनी लगावला. बनारस येथून मोदी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नुकतेच केंद्रात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ममता बॅनर्जी व जयललिता यांची मदत घ्यावी लागेल, असे विधान केले होते.
या संदर्भात विचारणा करता केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे. त्या पक्षासोबत ते असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. मोदी यांनी निवडणूक आयोगावर टीका केलेली नसून आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याचे भारती यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.(प्रतिनिधी)