१०० कोटी तातडीने देण्याची मागणी

By Admin | Updated: December 10, 2014 00:43 IST2014-12-10T00:43:44+5:302014-12-10T00:43:44+5:30

शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळावी, यासाठी घोषणा केलेला १०० कोटींचा निधी महापालिकेला तातडीने उपलब्ध करावा, तसेच शहरातील विविध प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी नागपूर शहरातील

100 crore urgently demanded | १०० कोटी तातडीने देण्याची मागणी

१०० कोटी तातडीने देण्याची मागणी

शहर विकासासाठी प्रयत्न : मुख्यमंत्र्यांना आमदार भेटले
नागपूर : शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळावी, यासाठी घोषणा केलेला १०० कोटींचा निधी महापालिकेला तातडीने उपलब्ध करावा, तसेच शहरातील विविध प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी नागपूर शहरातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंगळवारी भेट घेऊ न चर्चा केली.
भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृ ष्णा खोपडे, अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे व विकास कुंभारे आदींचा यात समावेश होता. उपलब्ध केला जाणारा निधी शहरातील विकास कामांवरच खर्च व्हावा. विकास कामाचा आराखडा तयार करताना आयुक्तांनी आमदारांशी चर्चा करावी. चिखली खुर्द भागातील अनधिकृत ले-आऊ ट व कम्पोस्ट डेपोसाठी आरक्षित जागेवर ८० टक्के घरे झाली आहेत. परंतु आरक्षण कायम असल्याने या भागात विकास कामे करताना प्रशासनाला अडचणी येतात. लोकांना सुविधा मिळत नसल्याने येथील आरक्षण काढण्यात यावे, अशी मागणी आमदारांनी केली. अडचणी दूर करून शहर विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करू; सोबतच इतर समस्या मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदारांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 100 crore urgently demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.