नागपुरात  १०० कोटींचे बनावट बिल रॅकेट उजेडात : तीन संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:45 AM2020-02-08T00:45:05+5:302020-02-08T00:52:35+5:30

डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी करदात्यांचे बिझनेस कार्यालय आणि निवासांची तपासणी केली. या कारवाईत छुप्या डिजिटल डेटासह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली. १०० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या या व्यवहारात ७ फेब्रुवारीला तीन संचालकांना अटक केली.

100 crore fake bill racket exposed in Nagpur: Three directors arrested | नागपुरात  १०० कोटींचे बनावट बिल रॅकेट उजेडात : तीन संचालकांना अटक

नागपुरात  १०० कोटींचे बनावट बिल रॅकेट उजेडात : तीन संचालकांना अटक

Next
ठळक मुद्दे डीजीजीआयची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : बनावट इनव्हाईस जारी करणे आणि फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या उपलब्धतेसंदर्भात प्राप्त माहितीच्या आधारे, डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी ५ आणि ६ फेब्रुवारीला शोधमोहीम राबविली. या मोहिमेत बनावट इनव्हाईस रॅकेटमध्ये सहभागी करदात्यांचे बिझनेस कार्यालय आणि निवासांची तपासणी केली. या कारवाईत छुप्या डिजिटल डेटासह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली. १०० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या या व्यवहारात ७ फेब्रुवारीला तीन संचालकांना अटक केली.
करदात्यांनी १०८ कोटींपेक्षा जास्त मूल्याचे बनावट इनव्हाईस मिळविले व जारी केले आणि ९.७५ कोटी रुपयांच्या फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला. बनावट पावत्या प्राप्त केल्याचे आणि दिल्याचे व्यावसायिकांनी मान्य केले तसेच बनावट पावत्या प्राप्त करण्यासाठी बऱ्याच प्रोप्रायटरशिप फर्म स्थापन केल्याचे तथ्यही मान्य केले. याचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांचे बनावट इनव्हाईस आणि फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविले.
अधिकाऱ्यांनी बाबा इन्टरप्राईजेसचे रामप्रसाद गंभीराजी बोरकर, भवानी इन्टरप्राईजेसचे मो. शमशाद शेख आणि करण स्टीलचे नेहर घनश्याम बोपचे यांना अटक केली. बनावट इनव्हाईस रॅकेटमध्ये सामील झालेले मूळ सूत्रधार आणि इतर घटकांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

यांच्यावर झाली कारवाई 

  •  बाबा इन्टरप्राइजेस : रामप्रसाद गंभीराजी बोरकर, २७, मारोती सोसायटी, भरतवाडा रोड, भरतनगर. (४ कोटी, ६६ लाख ९८ हजार ७१० रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले.)
  •  भवानी इन्टरप्राइजेस : मोहम्मद शमशाद शेख, युनिट मार्बल, गंगाबाई घाट रोड, भांडेवाडी, नागपूर. (२ कोटी ४७ लाख ४७ हजार ७६९ रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले. )
  •  करण स्टील : नेहर घनश्याम बोपचे, ८, भवानीनगर, पुनापूर रोड, पारडी (२ कोटी, १९ लाख, ३२ हजार ५६० रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले.)
  •  कुश ट्रेडर्स : राम कैलाशचंद्र जांगीड, फ्लॅट ९, सुखानी कॉम्प्लेक्स, छापरूनगर चौक, लकडगंज (४१ लाख ६८ हजार ९६९ रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले.)
  •  साईकृपा इन्टरप्राइजेस : हर्षल बंडू रामटेके, शॉप ६, श्रीराम कुंज, कच्छी विसा भवनाजवळ.


एकूण बनावट बिलाचा स्वीकार : ५४ कोटी १९ लाख ३३ हजार ३७८ रुपये.
एकूण बनावट बिल जारी केले : ५४ कोटी १९ लाख ३३ हजार ३७८ रुपये.

Web Title: 100 crore fake bill racket exposed in Nagpur: Three directors arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.