शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार मेगावॅटचे ‘मेगा’ वीज उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:57 IST

महानिर्मितीने औष्णिक, जल, पवन व सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून सोमवारी दुपारी १.२८ मिनिटांनी सर्वाधिक १० हजार मेगावॅट वीज उत्पादन केले. ही आजवरचे सर्वोच्च उत्पादन आहे. दरम्यान १.४० मिनिटांनी महानिर्मितीने आपलाच उच्चांक मोडित १० हजार ९८ मेगावॅट वीजनिर्मितीचा नवा उच्चांक गाठला.

ठळक मुद्देमहानिर्मितीच्या इतिहासातील पहिलीच घटना : जलविद्युतने दिला मोठा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोराडी ): महानिर्मितीने औष्णिक, जल, पवन व सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून सोमवारी दुपारी १.२८ मिनिटांनी सर्वाधिक १० हजार मेगावॅट वीज उत्पादन केले. ही आजवरचे सर्वोच्च उत्पादन आहे. दरम्यान १.४० मिनिटांनी महानिर्मितीने आपलाच उच्चांक मोडित १० हजार ९८ मेगावॅट वीजनिर्मितीचा नवा उच्चांक गाठला.तप्त उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी वाढली आहे. सोमवारी (दि.२०) ही मागणी २२ हजार ३०० मेगावॅटवर पोहोचली होती. महानिर्मितीने आपल्या अखत्यारित सर्व औष्णिक, जल, वायू व सौर ऊर्जेवर आधारित संचातून जास्तीत जास्त क्षमतेने विजेचे उत्पादन करून एकूण विजेच्या मागणीत १० हजार ३४ मेगावॅटची मदत केल्याने विजेची मागणी पूर्ण करण्यात मोठी मदत झाली. राज्यातील २२ हजार ३०० मेगावॅटची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीची १० हजार ३४ मेगावॅट, खासगी वीज उत्पादकांकडून ७ हजार ३०७ मेगावॅट तर केंद्र शासनाच्या प्रकल्पातून ५३५७ मेगावॅटची मदत झाली.महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज केंद्राने सर्वात जास्त २ हजार ५५० मेगावॅट, कोराडी वीज केंद्राने १५०० मेगावॅट, भुसावळ ९६७, खापरखेडा वीज केंद्राने ९५१ मेगावॅट त्यानंतर नाशिक ५६१ मेगावॅट, पारस ४५० तसेच उरण येथील वायू, जल व सौर वीज केंद्रातून एकूण २१०० मेगावॅट वीज प्राप्त झाली. एकावेळी १० हजार ३४ मेगावॅटची वीजनिर्मिती करून महानिर्मितीने इतिहास रचला आहे. यासाठी दर्जेदार कोळसा, कोळशाचा क्षमतेने वापर, वीजसंचांनी दिलेली साथ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परीश्रम उपयोगी पडले. या उल्लेखनीय उत्पादनाने महानिर्मितीचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष (व्यवस्थापकीय संचालक) अरविंद सिंग, संचालक चंद्रकांत थोटवे यांनी सर्व मुख्य अभियंते, अधिकारी, विभागप्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.गत ७० वर्षांतील ही ऐतिहासिक नोंद आहे. महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन. त्यांची अहोरात्र मेहनत सार्थकी आली. भविष्यात भुसावळ केंद्रातून ६६० मेगावॅट आणि कोराडी केंद्रातून १३२० मेगावॅट अधिकच्या विजेची निर्मिती केली जाईल. यासोबतच राज्यात १० हजार मेगावॅटचे सोलर प्रकल्प लवकरच कार्यान्वित होतील. चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर