10 thousand help in the form of loan to hawkers | फेरीवाल्यांना कर्ज स्वरूपात १० हजाराची मदत

फेरीवाल्यांना कर्ज स्वरूपात १० हजाराची मदत

ठळक मुद्दे आत्मनिर्भर निधी : केंद्र सरकारच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊ न कालावधीमध्ये शहरातील पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रशासित पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून १० हजाराचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
२४ मार्च २०२० व त्यापूर्वी शहरात पथ विक्री करीत असलेल्या सर्व पथ विक्रेत्यांना लागू असेल. सदर पथ विक्रेत्यांना चार प्रवर्गात विभागण्यात आले आहे. ‘अ’ प्रवर्ग - महानगरपालिका/ नगर परिषदा/नगर पंचायती यांनी प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र असलेले पथ विक्रेते. ब प्रवर्गात सर्वेक्षणात आढळलेले परंतु त्यांना विक्री प्रमाणपत्र दिले गेले नाही, क प्रवर्ग सर्वेक्षणात जे पथ विक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू केली आहे. अशा नगर पथ विक्रेत्यांना नागरी संस्थांमार्फत शिफारसपत्र प्राप्त झालेले पथ विक्रेते. ड प्रवर्ग - जवळपासच्या विकास/पेरी-शहरी/ग्रामीण भागातील पथ विक्रेते नागरी क्षेत्रामध्ये पथ विक्री करतात आणि त्यास नागरी संस्थांमार्फत शिफारसपत्र प्राप्त झालेले पथ विक्रेते.
पथविके्र त्यांना या कर्जाची परतफेड करावयाची आहे. सदर कर्ज विनातारण असेल. विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी परतफेड करणारे पथ विक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळत्या भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास ते ७ टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील.
योजनेच्या लाभाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा असून, सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावयाची आहेत. या योजनेची सविस्तर माहिती प्राप्त करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विशेष मदत कक्षाला भेट देऊन शहरातील पथ विक्रेत्यांनी या योजनेच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 10 thousand help in the form of loan to hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.