शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

नागपूरनजीकच्या भांडेवाडीत १० लाख मेट्रिक टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:33 IST

भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. डम्पिंगयार्ड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे. नागरिनांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महापालिके चा प्रयत्न आहे. यातूनच भांडेवाडीत तब्बल १० लाख मेट्रिक टन कचरा जमा आहे़ या कचऱ्याचे बायो मायनिंग करून त्य़ाची विल्हेवाट लावली जाणार आहे़

ठळक मुद्देबायोमायनिंगद्वारे लावणार विल्हेवाट : स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. डम्पिंगयार्ड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे. नागरिनांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महापालिके चा प्रयत्न आहे. यातूनच भांडेवाडीत तब्बल १० लाख मेट्रिक टन कचरा जमा आहे़ या कचऱ्याचे बायो मायनिंग करून त्य़ाची विल्हेवाट लावली जाणार आहे़शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा भांडेवाडी येथे जमा केला जातो़ यातील २०० ते ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर सध्या प्रक्रिया केली जाते. उर्वरित ९०० मेट्रिक टन कचरा तसाच साठविला जातो. भांडेवाडी येथे साचलेला कचरा १० लाख मेट्रिक टन इतका आहे़ जमा असलेल्या या कचऱ्यामुळे आसपास प्रदूषण वाढले आहे़ शिवाय येथे आग लागण्याच्या घटनाही वारंवार घडत आहे़ त्यामुळे जमा असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे़ बायोमायनिंग पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावून ती जागा मोकळी केली जाणार आहे़ या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती़ एकूण चार निविदा प्राप्त झाल्या होत्या़ यातून नियमाप्रमाणे तीन निविदांची निवड करण्यात आली़ त्यांना निविदा भरण्यासाठी पात्र ठरविण्यात आले़ तसेच आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोझल) घेण्याकरिता कळविण्यात आले़ मात्र झिग्मा ग्लोबल एनव्हॉर्न सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड एकाच निविदाकाराने आरएफपी घेतले़ या कंपनीने बायोमायनिंगच्या कामाकरिता १ हजार २३० रुपये प्रति मेट्रिक टन इतका दर दिला होता़ हा दर अधिक असल्यामुळे मनपातर्फे कंपनीला दर कमी करण्याकरिता पत्र देण्यात आले़ यानंतर कपंनीने १ हजार ४० रुपये प्रति मेट्रिक टन इतक्या दरात काम करण्यास तयारी दर्शविली़दुसरीकडे दराबाबत विचार करण्यासाठी महापालिकेद्वारे नियुक्त त्रिसदस्यीस समितीने १ हजार १५ रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दराची शिफारस केली आहे़ आता दरनिश्चिती व अंतिम निर्णयाकरिता हा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे़

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका