दारूसह १ लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST2021-05-22T04:08:22+5:302021-05-22T04:08:22+5:30

भिवापूर : चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकीने देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. यात दारूसह दुचाकी ...

1 lakh items including liquor confiscated | दारूसह १ लाखाचा मुद्देमाल जप्त

दारूसह १ लाखाचा मुद्देमाल जप्त

भिवापूर : चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकीने देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. यात दारूसह दुचाकी असा एकूण १ लाख १७ हजार ६८० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी दुपारच्या सुमारास उमरेड-भीसी मार्गावरील सालेभट्टी फाटा परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने केली. निखील भरडे रा. सावरगाव ता. चिमुर व कैलास नारनवरे रा. मासळ ता. चिमुर अशी आरोपींची नावे आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना सदर आरोपी आपल्या यामाहा एफ.झेड.एस. या विनाक्रमांकाच्या दुचाकीने भरधाव वेगात भिसीकडे जात होते. गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी दुचाकी थांबवून तपासणी केली असता आरोपींकडे देशी दारुच्या ९६ बॉटल आढळल्या. ७,६८० रुपयांची दारु व दुचाकी असा एकूण १ लाख १७,६८० रुपयांचा माल जप्त करत आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: 1 lakh items including liquor confiscated