२४ तासांत १ फुल, ३ हाफ मर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:10 IST2021-01-23T04:10:04+5:302021-01-23T04:10:04+5:30

२४ तासांत १ फुल, ३ हाफ मर्डर पाचपावलीत पुतण्याने केली काकाची हत्या तर कोतवालीत शत्रूंनी केला तरुणाचा गेम ...

1 flower, 3 half murders in 24 hours | २४ तासांत १ फुल, ३ हाफ मर्डर

२४ तासांत १ फुल, ३ हाफ मर्डर

२४ तासांत १ फुल, ३ हाफ मर्डर

पाचपावलीत पुतण्याने केली काकाची हत्या तर कोतवालीत शत्रूंनी केला तरुणाचा गेम

- पारडीत ऑटोचालकावर - कळमन्यात आणि कोतवालीत युवकांवर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - उपराजधानीत गेल्या ३६ तासांत दोघांची हत्या झाली, तर तिघांच्या हत्येचा प्रयत्न झाला. पाचपावली, कोतवाली पारडी आणि कळमना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या.

---

हत्या, हत्येच्या प्रयत्नांच्या या चार घटना शहरात दहशत निर्माण करून गेल्या असताना शुक्रवारी रात्री गुंडांच्या एका टोळक्याने पुन्हा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंद आडे (वय ३५) या तरुणाची भीषण हत्या केली. आरोपींची नावे स्पष्ट झाली नाहीत. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ते चार ते पाच जण होते. त्यांनी शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घातक शस्त्राचे घाव घालून आडेला संपविले. जुनी शुक्रवारी वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा, तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आजूबाजूच्यांकडून आडेच्या हत्येची माहिती घेतली. त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या भागांत पथके पाठविली. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

----

Web Title: 1 flower, 3 half murders in 24 hours