शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड सुवर्णसंधी, ‘लोकमत’ व ‘ICICI प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड’ वेबिनारला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:49 AM

अर्थतज्ज्ञ, एनएसडीएलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन यावेळी लाभले. महाराष्ट्र आणि गोवा येथील हजारो लोकांनी यामध्ये सहभाग घेतला.

मुंबई : जीवनामध्ये प्रत्येकजण स्वप्न पाहतो. या स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड सुवर्ण संधी आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार येथे केलेली गुंतवणूक सर्वोत्तम ठरत आहे, असा सूर ‘लोकमत’ व ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सद्य परिस्थितीत आपले वित्त व्यवस्थापन कसे करावे आणि म्युच्युअल फंड’ या विषयावरील स्मार्ट इन्व्हेस्टर या वेबिनारमधून निघाला.कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये भविष्यातील वित्त व्यवस्थापनासाठी गुंतवणूक करण्याचा अनेकजण विचार करत आहेत. त्यांच्यासाठी हा वेबिनार दिशादर्शक ठरला. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसी स्पीकर गौरव जाजू आणि अर्थतज्ज्ञ, एनएसडीएलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन यावेळी लाभले. महाराष्ट्र आणि गोवा येथील हजारो लोकांनी यामध्ये सहभाग घेतला.गौरव जाजू म्हणाले, जुन्या पिढीमध्ये लोक धोका नको म्हणून शिल्लक रक्कम ठेवीमध्ये अथवा मालमत्ता खरेदीत गुंतवणूक करत होते. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीमध्ये फायदा कमी होता. त्यावेळी बचतीला महत्त्व होते. सध्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. भारत हा युवकांचा देश असून, ती जमेची बाजू आहे. सध्याच्या पिढीकडे पैसा आहे. मात्र, त्यांचा पैसा चैनीच्या वस्तू खरेदीसाठी खर्च होत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास शिल्लक रकमेच्या योग्य नियोजनाबरोबर परतावाही चांगला मिळणार आहे.कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. सेन्सेक्स ४२ हजारांवरून २६ हजार आणि सध्या ३४ हजारांवर आला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये असा चढउतार होत असतो. २००८ मध्येही अशाच प्रकारे आर्थिक संकट आले होते. गुंतवणूकदारांना भीती वाटली होती. यामध्येही अनेकांनी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरली. पुढील काही महिने कोरोनाचे सावट राहण्याची शक्यता असून, गुंतवणूक करताना ‘मनी मॅनेजर’ महत्त्वाचे असल्याचे जाजू यांनी सांगितले.चंद्रशेखर टिळक म्हणाले, जीवनामध्ये दुचाकी असल्यास चारचाकी घेणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, मोठे घर घेणे आणि निवृत्तीनंतर चांगले आयुष्य जगणे असे लक्ष्य असते. यासाठी मिळणाऱ्या उत्पन्नातून दर महिन्याला बचत केली जाते. मात्र, ही गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तरच चांगला फायदा मिळू शकतो. कोरोनामुळे गुंतवणुकीचा पॅटर्न बदललेला आहे.पूर्वी कार्यालयामध्ये जाऊन काम करत होते. आता बहुतांशी वर्क फॉर्म होम करत आहेत. त्यामुळे काहींचे पगार अथवा उत्पन्न कमी-अधिक झाले आहे. पूर्वी ‘उत्पन्न वजाखर्च शिल्लक रक्कम बचत’अशी संकल्पना होती. आता यामध्ये बदल करण्याची गरज असून ‘उत्पन्न वजा गुंतवणूक शिल्लक रकमेतून खर्च’ असे करण्याची वेळ आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास महिन्याला चांगले उत्पन्नही मिळू शकते. म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यावसायिक आहे. गुंतवणूकदाराचे वय, धोका पत्करण्याची क्षमता पाहणे महत्त्वाचे आहे, असेही टिळक यांनी गुंतवणूकदारांना सुचविले.कोरोनाच्या संकटामध्ये कोणता खर्च अनावश्यक आणि आवश्यक हे लोकांना समजले आहे. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड ही सुवर्णसंधी आहे. यावेळी विवेक मेहेत्रे यांनी सूत्रसंचालन केले.>तज्ज्ञांच्या टिप्सजीवन विमा उतरविणे योग्य, पण विमा पॉलिसी म्हणजे गुंतवणूक नाही. निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडच योग्य गुंतवणूककोरोना संकटात लवकरात लवकर गुंतवणूक केल्यास फायदा जादा मिळणार.मालमत्ता, ठेवी, सोने खरेदीपेक्षा इक्विटी शेअर्समधील गुंतवणूक परतावा सर्वाधिकप्रथम गुंतवणूक करत असाल तर सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) योग्य ठरेलएसआयपी थांबविल्यास भविष्यातील उद्दिष्ट्ये पूर्ण होण्यास अडचणीचे ठरू शकते.>गौरव जाजू,रिजनल हेड, आयसीआयसीआय म्युच्युअल फंड