शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ईडीला हवाय देशमुख यांच्या मालमत्तेसह सहा विषयांसंबंधी सविस्तर तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 06:05 IST

देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर नसले तरी त्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेत आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.

ठळक मुद्देदेशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर नसले तरी त्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेत आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे

जमीर काझी

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर नसले तरी त्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेत आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. देशमुख यांनी मंगळवारी ईडीच्या दुसऱ्या समन्सवरही स्वतः कार्यालयात हजर न राहता वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले. मंगळवारी त्यांचे वकील ॲड. इंद्रपाल सिंग हे ईडीच्या कार्यालयात हजर राहून ज्यासंबंधी चौकशी केली जाईल, त्यासंबंधित माहिती विचारली, त्यावर त्यांना देशमुख यांच्यासह नातेवाइकांच्या नावे असलेली जंगम व स्थावर मालमत्ता, पाच वर्षांचा आयकर परताव्याचा तपशील, नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा सविस्तर तपशील, पाच वर्षांत जमा झालेली देणगी व एकूण निधी, खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे, यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा तपशील, दोघांशी झालेल्या संभाषणाबाबतचे तपशील, त्याच्या नोंदीची सविस्तर माहिती मागण्यात आली आहे. या प्रश्नांच्या अनुषंगाने देशमुख यांच्याकडे चौकशी केली जाईल. देशमुख यांच्या वकिलांनी त्यासाठी अवधी मागितला असला तरी त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यांना लवकरच तिसरे समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याचे समजते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय